लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रभागातील एका गटारीवरील स्लॅब कोसळून खड्डा पडला होता. हा खड्डा दुरुस्त करण्याची मागणी वारंवार होत होती. अखेर महिन्याभरानंतर दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
प्रभाग १७ मधील नयततारा हाॅस्पिटलच्या चौकातील रस्त्यावर महापालिकेने काही महिन्यापूर्वी नवीन गटार बांधली होती. हा रस्ता तेथून सिव्हिल रुग्णालयाकडे येतो. गटारीवर स्लॅबही टाकण्यात आला होता. पण त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. महिन्यापूर्वी अवजड वाहनामुळे गटारीवरील स्लॅब कोसळून खड्डा पडला. नागरिकांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. शिवाय खड्ड्यात नारळाची झावळी उभी करून लक्ष वेधून घेतले होते. अखेर सोमवारी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली. त्याची दखल घेत महापौरांनी तातडीने स्लॅबच्या दुरुस्तीचे आदेश दिले. प्रशासनानेही दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.