जयवंत आदाटे।लोकमत न्यूज नेटवर्कजत : जत नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु निवडणूकपूर्व राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे जत शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.डिसेंबरमध्ये जत नगरपालिकेत नवे नगरसेवक येणार आहेत. त्यापूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ४२ हजार असून मतदार २८ हजार ५०० आहेत. एकूण १० प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन याप्रमाणे वीस नगरसेवक, एक नगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक अशा एकूण २३ जणांचे मंडळ असणार आहे.
बाजार समितीचे माजी सभापती व वसंतदादा गटाचे जत तालुक्यातील प्रमुख सुरेश शिंदे यांनी कॉँग्रेस पक्षातून नुकताच राष्टÑवादीत प्रवेश केला आहे. त्यांचे समर्थक व वसंतदादा विकास आघाडीतून निवडून आलेले सहा नगरसेवक आणि राष्टÑवादीचे उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नेते राष्टÑवादीत, तर त्यांचे समर्थक नगरसेवक कॉँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम गटात सामील झाले आहेत. त्यामुळे जत शहरातील कॉँग्रेस पक्ष मजबूत होण्यास मदत मिळाली आहे.गत निवडणुकीत सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा विकास आघाडी, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनेल आणि राष्टÑवादी असा तिरंगी सामना झाला होता. शिंदे गटाचे आठ, सावंत समर्थक सात व राष्टÑवादीचे तीन नगरसेवक असे पक्षीय बलाबल होते. मागील पाच वर्षात जत शहर आणि तालुक्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाला. शिंदे यांनी विक्रम सावंत यांना डावलून आमदार विलासराव जगताप यांच्याशी युती करून नगरपालिकेत सुरुवातीस सत्ता स्थापन केली. त्यानंतर अल्पावधित शिंदे व सावंत यांनी एकत्र येऊन पालिकेत सत्ता स्थापन केली.
कालांतराने या दोन नेत्यांत मतभेद निर्माण झाले. परंतु नगरसेवक मात्र मतभेद विसरुन एकत्रित राहिले आहेत.जत शहरातील वाहतूक व्यवस्था, टपरी धारकांचे पुनर्वसन व अतिक्रमण आणि कचरा निर्मूलन आदी प्रश्न मागील पाच वर्षात प्रलंबित राहिले आहेत. विकास कामांऐवजी एकमेकांची जिरविण्यात आणि सोयीचे राजकारण करण्यातच नेतेमंडळी आणि नगरसेवकांनी धन्यता मानली आहे.त्यामुळे मतदारांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत भाजप व कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. प्रत्येक प्रभागात गोपनीय बैठका घेऊन मतदारांचा कानोसा घेण्यात सुरुवात केली आहे.पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. पक्षाची ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांना आपले करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. - चंद्रकांत गुड्डोडगी, भाजप तालुकाध्यक्ष
नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना घेऊन सर्वसमावेशक पॅनेल आम्ही तयार करणार आहे. जत शहराचा कायापालट करण्यासाठी एक व्हिजन घेऊन आम्ही मतदारांसमोर जाणार आहे. कॉँग्रेस पक्षाला सध्या चांगले वातावरण आहे.- सुजय ऊर्फ नाना शिंदे,कॉँग्रेस, तालुका कार्याध्यक्ष्सर्वच प्रभागात नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी जत शहरासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. केलेल्या कामांची पोहोच पावती मतदारांकडून निश्चित मिळणार आहे.- उत्तम चव्हाण, राष्ट्रवादीयुवक कॉँग्रेस तालुकाध्यक्ष ा