शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

पालिका महापौर, आयुक्त, नगरसेवक उतरले मैदानावर

By admin | Published: February 14, 2016 12:50 AM

वर्धापन दिन क्रीडा स्पर्धा; राजू गवळी, सुहास व्हटकर प्रथम

सांगली : महापालिकेचे कारभारी, अधिकारी आणि कर्मचारी कामाचा ताण विसरून छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या लाल मातीत रमून गेले. राजकीय डावपेच आणि फायलींच्या ढिगाऱ्यातून अलगद बाजूला येत महापौर, आयुक्त व नगरसेवकांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. निमित्त होते महापालिका वर्धापनदिन क्रीडा स्पर्धेचे. मनपाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट, धावणे, चालणे आदी खेळांचा समावेश होता. मनपा क्रीडा विभागाने स्पर्धेचे आयोजन केले. मनपा क्रीडाधिकारी नितीन शिंदे यांनी संयोजन केले. पंच म्हणून मधुकर साळुंखे, विनायक विभुते, सुरेश चिखले, प्रशांत कोरे यांनी काम पाहिले. नगरसेवक राजू गवळी व घरपट्टी विभागातील लिपिक सुहास व्हटकर यांनी १०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी क्रिकेटमध्ये जोरदार षटकार ठोकले. नगरसेविका आशा शिंदे व रोहिणी पाटील यांनी चालण्याची स्पर्धा गाजवली. नगरसचिव चंद्रकांत आडके व नूतन उपमहापौर विजय घाडगे यांनी धावणेत, तर सहायक आयुक्त टीना गवळी यांनी संगीत खुर्चीत बाजी मारली. स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अंतिम निकाल असा : १०० मीटर धावणे : पदाधिकारी गट : नगरसेवक राजू गवळी, उपमहापौर विजय घाडगे, नगरसचिव चंद्रकांत आडके. १०० मीटर धावणे : कर्मचारी गट : सुहास व्हटकर, अमित कांबळे, अमोल माने. २ कि.मी. चालणे : महिला : नगरसेविका सुनीता वाघमारे, रोहिणी पाटील, आशा शिंदे, संगीता खोत. २ कि.मी. चालणे : पुरूष : विजय कदम, सुनील कुंभार, अमोल माने. १ कि.मी. चालणे : अपंग : प्रदीप सावंत, तानाजी मदने, सुभाष केसरे. संगीत खुर्ची : प्रियांका जाधव, रोहिणी पाटील, टीना गवळी. रांगोळी : वर्षा भोकरे, सीमा पाटील, सुनीता वाघमारे. सांघिक स्पर्धा : कबड्डी : आयुक्त संघ (प्रथम), महापौर संघ (द्वितीय). क्रिकेट : आयुक्त संघ (प्रथम), पत्रकार संघ (द्वितीय). व्हॉलिबॉल : महापौर संघ (प्रथम), आयुक्त संघ (द्वितीय). विजेत्यांना महापौर हारूण शिकलगार यांच्याहस्ते सन्मानचिन्ह प्रदान केले. (प्रतिनिधी)