शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
2
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
3
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
4
IND vs NZ: ४६ धावांत All Out! Team India च्या नावे झाले हे ५ लाजिरवाणे विक्रम
5
“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका
6
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
7
Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द
8
आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन
9
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
10
IND vs NZ : चूक कोणाची? ताळमेळ नसल्यानं सोपा झेल सुटला; पाकिस्तानसारखी फजिती, रोहित संतापला
11
१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का!
12
सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...
13
Vastu Tips: ताटात एकाचवेळी तीन पोळ्या वाढू नका; वास्तू दोष निर्माण करणाऱ्या चुका टाळा!
14
Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!
15
मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ
16
Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय
17
प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा 'गब्बर'! एकट्यानं इंग्लंडला लोळवलं; सात बळी अन् धवनसारखे सेलिब्रेशन
19
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश
20
अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा

विठुरायाचीवाडीतील खून प्रेमाच्या त्रिकोणातून, दोघा संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 4:54 PM

बनाप्पा हा प्रेयसीला भेटायला जाणार होता. प्रेयसीला भेटण्यास जाण्यापूर्वी त्याचा काटा काढला

कवठेमहांकाळ : विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बनाप्पा म्हार्नुर खूनप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, प्रेमाच्या त्रिकोणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित रॉबिन श्रीकांत खोत (वय २५, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) व संजय आप्पा गगणमहाले (वय ३३, रा. थबडेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित रॉबिन खोत याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मृत बनाप्पा हा रॉबिनचा मित्र असल्याने तो त्याच्यासोबत सतत असायचा. परंतु काही दिवसापूर्वी बनाप्पाचे आपल्या प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रॉबिनला आला. त्यामुळे रॉबिन हा बनाप्पावर चिडून होता. त्याने बनाप्पाचा काटा कायमचा काढायचे ठरवले.

गुरुवारी बनाप्पा हा प्रेयसीला भेटायला जाणार होता. त्यासाठी त्याने नवीन कपडे घातले होते. गुलाबाचे फूलही घेतले होते. प्रेयसीला भेटण्यास जाण्यापूर्वी रॉबिन, संजय यांच्यासोबत बनाप्पा जत- कवठेमहांकाळ रस्त्यावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये दारू पीत बसला.

त्यानंतर सव्वाअकराच्या दरम्यान सर्वजण हॉटेलमागे असणाऱ्या बंद मिलकडे गेले. तेथे रॉबिन व संजयने त्याला जाब विचारत पोटात, छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात रक्तबंबाळ हाेऊन बनाप्पा खाली पडला. त्यानंतर दोघांनी एक माेठा दगड त्याच्या डाेक्यात घालून चेहऱ्याचा चेंदामेंदा केला आणि घटनास्थळावरून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलिसांनी तपासाला गती देत दाेघांनाही अलकुड एस येथे ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून बनाप्पाचा खून केल्याचे रॉबिन याने कबुली जबाबात सांगितले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी