शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
4
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
5
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
6
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
7
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
8
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
9
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
10
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
11
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
12
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
13
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
15
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
16
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
17
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
18
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
20
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...

जागेच्या वादातून छातीवर मारली लाथ, मिरजेतील वृद्धाचा जागीच मृत्यू; निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या पुत्रास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 1:05 PM

तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत वृद्धाच्या छातीवर जोरात लाथ मारली

मिरज : मिरजेत पंढरपूर रस्त्यावर जागेच्या वादातून छातीत लाथ मारल्याने जयंतीलाल मूलजी ठक्कर (वय ८२) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. वृद्धाच्या खूनप्रकरणी राहुल मोहन मोरे (वय ४२) या निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या पुत्रास पोलिसांनी अटक केली. याबाबत मयूर जयंतीलाल ठक्कर यांनी वडिलांच्या खुनाची फिर्याद दिली आहे.मिरज-पंढरपूर रस्त्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठक्कर यांचे श्रीवल्लभ निवास हे घर व घरासमोर पडदे व गादी विक्रीचे दुकान आहे. राहुल मोरे हा त्यांचा शेजारी असून ठक्कर यांच्या गादी कारखान्याच्या शेडचा काही भाग राहुल याच्या प्लाॅटमध्ये आल्याचा राहुल याचा आक्षेप होता.गुरुवारी सकाळी घरासमोरील दुकानात मयूर व वडील जयंतीलाल बसले असताना राहुल मोरे तेथे आला. त्याने तुमच्या कारखान्याच्या शेडचा भाग माझ्या प्लॉटमध्ये येतो तो आजच्या आज काढून घ्या, असे ठक्कर यांना बजावले. मयूर ठक्कर यांनी शासकीय मोजणी करुन घेऊन जर तुमच्या प्लॉटमध्ये शेडचा भाग येत असेल तर काढून घेतो, असे सांगितल्याने राहुल मोरे रागाने ठक्कर यांच्या दुकानात शिरला.मयूर ठक्कर यांनी तू दुकानातून बाहेर जा असे म्हणाल्याने मला जा म्हणणारे तुम्ही कोण, असे म्हणत रागाने शिवीगाळ करून मयूर यांना ढकलून पाठीत लाथ मारून खाली पाडले. तुम्ही शेडचा भाग काढला नाही तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले.यावेळी मयूर यांचे वडील जयंतीलाल यांनी मध्यस्ती करीत त्यास समजावण्याचा प्रयत्न केल्याने, तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत जयंतीलाल यांच्या छातीवर जोरात लाथ मारून त्यांना खाली पाडले. छातीवर लाथ वर्मी बसल्याने वृद्ध जयंतीलाल यांचा जागीच मृत्यू झाल्याची तक्रार आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करुन राहुल मोरे यास पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सावंत्रे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारी