- दिलीप मोहितेविटा : दुष्काळी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील पोसेवाडी गाव. या गावातील भगवान नारायण जाधव या बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने १२ हजाराहून अधिक जुन्या वस्तूंचे संग्रहालय साकारले आहे. गेल्या २० वर्षापासून जुन्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद जोपासलेला हा तरुण ३५ पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.
खानापूरपासून अवघ्या तीन किलोमीटरवरच्या पोसेवाडी येथील भगवान जाधव यांनी सातवीच्या पुस्तकातील विविध संग्रह या पाठ्यातून बोध घेत, शिक्षक संपत भगत यांच्या प्रेरणेतून जुन्या वस्तू एकत्रित करण्याचा श्रीगणेशा केला. आज त्यांच्याकडे १२ हजारांहून अधिक जुन्या वस्तू पाहावयास मिळतात. पोस्टाची तिकिटे, २५०० विविध प्रकारची जुनी नाणी, ग्रामोफोन, कुंकवाचे विविध प्रकारचे ३०० करंडे, तोफगोळे, तलवारी, दिवे, ग्रामीण भागात पूर्वी वापरल्या जात असलेल्या वस्तू, सांगली, कोल्हापूर, औंध संस्थानांसारख्या देशातील विविध ३० संस्थानांचे मुद्रांक, १९६० पूर्वीपासूनची टपाल पत्रे यांचा त्यात समावेश आहे.
जाधव यांच्या या वस्तूंच्या संग्रहाची विविध ठिकाणी शंभरावर प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. मदर तेरेसा, अमिताभ बच्चन, रतन टाटा, सचिन तेंडूलकर, भीमसेन जोशी, तबला वादक झाकीर हुसेन यांच्यासह विविध क्षेत्रातील साहित्यिक, कलाकार, राजकीय नेते, शास्त्रज्ञांच्या ९५० स्वाक्षऱ्यांचा संच त्यांच्याकडे आहे. हे लक्ष्मी-नारायण वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी विविध भागातून शैक्षणिक सहली येत आहेत.
तब्बल ३५ पुरस्कारांचा मानकरीभगवान जाधव यांना आजपर्यंत तब्बल ३५ विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते विशेष गौरविण्यात आले. राज्य पातळीवरचा संकेत युवा रत्न पुरस्कार, औरंगाबाद येथील राष्टÑीय युवा दलित मित्र पुरस्कार, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार आदींसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
नव्या पिढीला ओळख व्हावीग्रामीण भागातील अनेक वापराच्या वस्तू काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. भविष्यात या वस्तू इतिहास बनून राहतील. नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी व त्यांना याचे महत्त्व समजावे, हा लक्ष्मी-नारायण पुरातन वस्तुसंग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे, असे मत भगवान जाधव यांनी व्यक्त केले.शिवकालीन वस्तूछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मशाल पेटविण्यासाठी वापरण्यात येणाºया बुधल्या, घंटा, अत्तरदाणी, स्टोव्हचे नमुने, अडकित्ते, चुन्याच्या डब्या, ब्रिटिशकालीन इस्त्रीचे विविध नमुने, अंडी उबवायचे यंत्र, पाणी गरम करण्याचे घंगाळ, सुमारे २५० वर्षांपूर्वीचे शिलाईयंत्र आदी पुरातन वस्तू या संग्रहालयाचे महत्त्व वाढवत आहेत.पोसेवाडी येथील भगवान जाधव यांच्या संग्रहालयातील पुरातन वस्तू.