शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

नागपंचमी : उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे : अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:02 PM

बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देनागपंचमी : उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे : अभिजीत चौधरीनिर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश

सांगली: बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमी उत्सवानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम. बी. डुबुले, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एन. एम. मोहिते, शिराळा नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, वाळवा प्रांताधिकारी नागेश पाटील, शिराळा तहसिलदार गणेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यंत्रणांना जिवंत नागांची पूजा होणार नाही यासाठी चोख नियंत्रण ठेवावे, असे सांगून नाग पकडताना, जिवंत नागाची पूजा करताना, नागांच्या स्पर्धा भरवताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत असे सांगून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.वन विभागाने गस्ती पथकांची संख्या वाढवून परिणामकारकपणे अंमलबजावणी करावी. उत्सव काळात व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून चित्रीकरण करावे, आवश्यक तिथे सीसीटिव्ही लावावेत. आरोग्य विभागाने या काळात आवश्यक प्रतिबंधक लस उपलब्ध ठेवाव्यात. एनजीओनी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. कोठेही अनुचित प्रकार होत असल्यास तात्काळ पोलिस, वन विभाग आदि यंत्रणांशी संपर्क साधावा. उत्सव कायद्याच्या नियमांचे काटेकोर पालन करित शांततेत पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.नागपंचमी सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ध्वनीक्षेपणाची मर्यादा ओलांडू नये. कायद्याचे उल्लंघन न करता हा उत्सव साजरा करावा. याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच, यासाठी वनविभाग, आरोग्य विभाग, नगरपंचायत, अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी आगार, अंबामाता मंदिर ट्रस्ट, महावितरण आदी विभागांनी आपत्ती घडू नये यासाठी खबरदारी व पूर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSangliसांगली