लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतीचे नगरसेवक केदार नलवडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कीर्तनकार हरी कदम यांच्या कुटुंबाची गरज ओळखून त्यांना भाजीपाला विक्रीसाठी १२ हजार रुपये किमतीचा हातगाडा दिला. तसेच १०० गरजू कुटुंबांना व नगरपंचायत सफाई कामगारांना अन्नधान्य किट, कोविड रुग्णालयात पौष्टिक आहाराचे वाटप करून आदर्श काम केले.
तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, राम जाधव, हरुन शेख यांची प्रमुख उपस्थितीत हे वाटप केले.
गणेश शिंदे म्हणाले, कोरोनाकाळात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून दातृत्व दाखवत अनेक मंडळी पुढे येत आहेत. त्यापैकी नगरसेवक केदार नलवडे यांनी मोठ्या प्रमाणात केलेली मदत उपयुक्त आहे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून असे सामाजिक योगदान दिले पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयातून काम केल्यास कोरोना हद्दपार करण्यासाठी मदत होईल. नगरसेवक केदार नलवडे आणि त्यांच्या मित्र परिवाराने वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे.
यावेळी हारुण शेख, राहुल खबाले, सौरभ नलवडे, सुरेश शेळके, भूषण पाटील, बाजीराव नलवडे, सचिन दिवटे, वैभव इंगवले, स्वप्नील दिवटे, अभिषेक हसबणीस, अभिमन्यू नलवडे, प्रतीक हसबनीस, प्रथमेश गायकवाड, मोहसीन नालबंद, प्रथमेश शेटे, चेतन शिंत्रे, बाळकृष्ण घाडगे आदी उपस्थित होते.