सांगली : देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत सांगलीरेल्वे स्थानकाला ‘राणी चेन्नम्मा’ ही पहिली एक्स्प्रेस लाभली आहे. त्यामुळे शहरातील एखाद्या चौकास राणी चेन्नम्मा यांचे नाव देण्याची मागणी रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.ग्रुपचे उमेश शहा यांनी याबाबतचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनेक महत्त्वाचे चौक आहेत, ज्यांना अद्याप नाव दिलेले नाही. यामध्ये मार्केड यार्डसमोरील चौकाचाही समावेश आहे. याठिकाणी आयलँड विकसित करून राणी चेन्नम्मा यांचा पुतळा बसविण्यात यावा. तसेच या चौकाला त्यांचे नावही द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या चौकाच्या माध्यमातून राणी चेन्नम्मा यांच्या पराक्रमाची तसेच सांगली स्थानकाला मिळालेल्या त्यांच्या नावच्या ऐतिहासिक एक्स्प्रेसची आठवण पुढील अनेक पिढ्यांना राहील, असे शहा यांनी म्हटले आहे.
सांगलीतील चौकाला ‘राणी चेन्नम्मा’ यांचे नाव द्या; रेल्वे प्रवासी ग्रुपच्यावतीने मागणी
By अविनाश कोळी | Published: April 01, 2024 6:37 PM