शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

सांगलीतील मांगरुळच्या नम्रता मस्केचा स्पर्धा परीक्षेत डबल धमाका; एमपीएससीत यश, युपीएससीत 'क्लास वन'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 6:08 PM

वडिलांनी शेतीच्या उत्पन्नावरच दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले

विकास शहाशिराळा : मांगरूळ (ता. शिराळा) येथील नम्रता मस्के हिने वडिलांच्या पाठबळावर क्लास वन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती राज्यात २८ व्या क्रमांकाने यशस्वी झाली. मागील वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती राज्यात पहिली आली होती, तर मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून आठव्या क्रमांकाने यशस्वी ठरली होती. एकाच वेळी दोन्ही परीक्षांत अव्वल येणारी ती पहिलीच मुलगी होती.विक्रीकर अधिकारी हे पद हाताशी असतानाच प्रथम वर्ग अधिकारीपदासाठी तिची स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी सुरू होती. गेल्यावर्षी तिने जिद्द व मेहनतीच्या जोरावर विक्रीकर अधीक्षक व मंत्रालयात कक्ष अधिकारी पद मिळविले होते. मात्र, यावरच समाधान न मानता तिने पुढची तयारी सुरू होती. वडील ज्ञानदेव मस्के शेतकरी आहेत. त्यांच्या पाठबळावर तिने यशाच्या मार्गावर झेप घेतली.तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मांगरूळ येथे झाले. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही शिक्षणाच्या आड येऊ दिली नाही. नम्रताला श्रद्धा नावाची जुळी बहीण आहे. वडिलांनी शेतीच्या उत्पन्नावरच दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले.

सरकारी नोकरी यापूर्वीच मिळालेली असली, तरी क्लास वन अधिकारीपद खुणावत होते. कसून अभ्यास आणि आई-वडिलांच्या पाठबळावर यशाचा हा पल्ला गाठता आला. - नम्रता मस्के

टॅग्स :Sangliसांगलीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा