शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक नेहमी होतच असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नांदेड व जळगाव परिसरातून सांगलीत हळदीची आवक चांगलीच वाढली आहे. महापुराच्या स्थितीमुळे उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला असला तरी, बाहेरच्या राज्यातून आवक असल्याने हळद व्यवहारात स्थिरता दिसून येत आहे.चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे. संपूर्ण देशात हळदीसाठी प्रसिध्द असलेल्या आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या बाजारपेठांशी स्पर्धा करत सांगलीत आवक वाढताना दिसत आहे. दरवर्षी या भागातून १२ ते १४ लाख पोत्यांची आवक होत असते. शेजारच्या कर्नाटकात हळद उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. त्यात नांदेड, जळगाव परिसरातही हळदीच्या लागवडीत वाढ झाली आहे. यामुळे वाशिम, रिसोड येथे हळद व्यवहारात वाढ झाली असली तरी, सांगली बाजारपेठेवर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास आहे.शंभर वर्षांहून अधिक जुनी असलेली ही बाजारपेठ म्हणून सांगलीचा नावलौकिक कायम आहे. सांगलीत मिळणारी हळद दर्जेदार असणारच, याचा विश्वास देशभरातील व्यापाºयांना आहे. त्यामुळे व्यवहारातही नेहमीच वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांपूवीपर्यंत सांगलीमध्ये जानेवारी ते मे महिन्यापर्यंतच हळदीचा हंगाम चालत असे, मात्र आता वर्षभर सुरूच असतो.वायदे बाजारावर दर अवलंबून असल्याने सध्या राजापुरी हळदीचे सरासरी भाव प्रती क्ंिवटलला ६५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत, तर कडापाचे ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत आहेत. नांदेडच्या हळदीला सरासरी ५ हजार ते ५२००, तर जळगावच्या हळदीला सरासरी ४८०० ते ५२०० रुपये दर आहे.महापुरामुळे उत्पादनावर परिणामसांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यात हळद पिकाचेही नुकसान झाले असून, नवीन उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे, तर नांदेड परिसरात मात्र झालेल्या चांगल्या पावसामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नांदेड, जळगावच्या हळदीला सांगलीची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:16 AM