शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

नरेंद्र मोदी यांनी जनतेला सतत खोटी स्वप्ने दाखवली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:40 PM

अंकलखोप येथे सरपंचांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

अंकलखोप : ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सतत खोटे बोलत आहेत. युवकांना नोकऱ्या देतो, महागाई कमी करतो, अशी खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. मात्र गेल्या १० वर्षांत महागाईचा उच्चांक झाला आहे. गरिबांना संपवण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.अंकलखोप (ता. पलूस) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते. यावेळी सरपंच राजेश्वरी सावंत यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पटोले म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सरकार गुजरातधार्जिणे असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. राज्यात कॉंग्रेस आघाडीशिवाय पर्याय नाही. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यांत पडत असेल तर भ्रष्टाचार किती फोफावला आहे हे लक्षात येते. एकीकडे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणायचे आणि दुसरीकडे आमच्या दैवताचा अपमान करायचा हे फक्त भाजपच करू शकते. दुष्काळ व महापूर काळात डाॅ. विश्वजीत कदम जखमी असतानाही मदतकार्यात होते. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे काम फक्त कदम कुटुंबीयच करू शकतात.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळणार नाही या गैरसमजातून काही लोक बाजूला गेलेले असतात, त्यांना सन्मानाने पक्षात परत सामील करून घेतले जात आहे. अंकलखोपच्या सरपंचांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे.’ यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

बदल्यांसाठी पैसे द्यावे लागताहेतपटोले म्हणाले, ‘राज्यातून महिला व मुली मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत, त्यांचा तपास लागत नाही हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्या बदल्यांसाठी पैसे द्यावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.’

टॅग्स :SangliसांगलीNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदी