शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

नरेंद्र मोदी फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील

By संतोष भिसे | Published: November 27, 2023 4:51 PM

काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत

सांगली : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडून येणे ही फक्त भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीत सोमवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.पाटील म्हणाले, जगभरात सुरू असलेल्या युध्दांदरम्यान मोदी यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे तीन दिवस युध्दविराम मिळाला. हे फक्त मोदीच करु शकतात. पण काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या गाडीला चालकच नाही हेच त्यांच्या ध्यानी येत नाही. कोणीही येतो आणि त्यांच्या गाडीत बसतो. पण चालक नसलेली ही गाडी धावणार कशी?ते म्हणाले, अजित पवार  उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने माझे महत्व कमी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मी एक कोरे पाकिट आहे. त्यावर संघटना कोणता पत्ता लिहिल, तेथे जायचे एवढेच माझे काम आहे. पक्षात शिस्त असल्याने पक्षफुटीचा प्रसंग कधीच भाजपवर आलेला नाही. काही मंडळी नाराज होऊन बाजूला गेली असली, तरी त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामाची पद्धत वेगवेगळी आहे. दोघेही कामासाठी योग्य आहेत. फडणवीस यांची संवेदनशीलता महापुरावेळी दिसून आली, तर पवार यांच्या कामाचा उरक मोठा आहे. प्रशासनावर त्यांचा वचकही आहे. 

चर्चेतूनच मार्ग निघू शकतोपाटील म्हणाले, फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. महाराष्ट्रात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे. यामुळे तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला बसावे. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा