शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

इस्लामपूर शहरात ‘नशिला झिंग’ पॅटर्न जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:23 PM

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर आणि शहर परिसरात पोलिसांच्या दहशतीचा आलेख ढासळत चालला आहे. युवकांना ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर आणि शहर परिसरात पोलिसांच्या दहशतीचा आलेख ढासळत चालला आहे. युवकांना नोकरी नाही, म्हणून त्यांचे लग्न होत नाही. त्यामुळे हे युवक नशिल्या झिंग पॅटर्नच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. चौका-चौकात असलेल्या पानपट्टीवर नशिले पावडर पान खाऊन तसेच नशिल्या गोळ्यांचे सेवन करुन पुन्हा फुकटचंबू फाळकूटदादा आपला रुबाब दाखवताना दिसत आहेत. त्याला आता महाविद्यालयीन युवकांचीही साथ मिळू लागली आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी बहे नाका येथे जोरदार हाणामारीचाही प्रकार घडला.‘लोकमत’च्या दणक्याने शहरातील पान टपऱ्यांमधून विक्री होत असलेले नशिले पावडर पान काही दिवसांपुरतेच विक्री करणे बंद झाले. यामध्ये पोलिसांनीही आपला हात धुऊन घेतला. आता महिन्याचा अर्थपुरवठा पोलीस व अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना सुरु असल्याने खुलेआमपणे या पावडर पानाची विक्री पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. अशा पानपट्ट्यांपुढेच हे फाळकूटदादा मोठ्या प्रमाणात वावरतात. असे पान खाल्ले की मोठ्या प्रमाणात गुंगी येते. त्यामुळे आपण काय करतो हेही समजत नाही. यातूनच मग फुकट खाद्यपदार्थांची मागणी दुकानांमध्ये जाऊन केली जाते. तसेच काही ठिकाणी खंडणी मागण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. त्यातच आता नशा येणाºया गोळ्या सेवन करण्याचा फंडाही या फाटकूट दादांनी अवलंबला आहे.या नशेत धुंद झालेल्या फाळकूट दादांना एखाद्या दुकानदाराने वस्तू देण्यास नकार दिल्यास, त्याच्या दुकानाची मोडतोड करणे, मारहाण करणे असेही प्रकार दिवसाढवळ्या घडू लागले आहेत. याकडे पोलिसांचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या नशेत वावरणाºया फाळकूट दादांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.शहरात आता कॅफे संस्कृतीही वाढू लागली आहे. येथे प्रवेश देताना कपललाच देण्याचा रिवाज आहे. १0 रुपयांची कॉफी येथे १00 ते १५0 रुपयांना विकली जाते. या कपलला बसण्याची आणि अश्लील चाळे करण्यासाठी येथे नाहरकत दाखलाच देण्यात आला आहे. याला महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या प्रमाणात बळी पडू लागल्या आहेत. अशा कॅफेंवरही पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.पण पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नाही. या प्रकाराचा त्रास सर्वसामान्य इस्लामपूरकरांना होऊ लागला आहे. पोलिसांनी मोठी घटना घडण्यापूर्वीच याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.विश्वास साळोखेयांची आठवण..!पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या सिंघम स्टाईलचा वापर सुरु केला. प्रथम त्यांनी शहरातील फाळकूट दादांवर आपल्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर वाहतुकीला शिस्त लावताना, दुचाकी चालविणाºया अल्पवयीन मुलांवरही कारवाई केली. तसेच पानटपºयांमधून सुरु असलेल्या नशिल्या पावडर पानावरही मोठी कारवाई केली. परंतु काही कारणास्तव या अधिकाºयाची बदली झाली आणि शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा पहिलेच दिवस अनुभवावे लागत आहेत.