शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नथुराम गोडसेचे उदात्तीकरण देशासाठी घातक

By admin | Published: December 09, 2015 11:59 PM

श्रीपाल सबनीस : सांगलीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन

सांगली : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत. अशा प्रवृत्ती कायमच्याच संपल्या पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी सांगलीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात व्यक्त केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्यावतीने अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त येथील राजमती भवनात जयंती समारंभ, सेवक स्नेहमेळावा व ‘आदर्श सेवक’ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.श्रीपाल सबनीस म्हणाले, मार्क्सचा विचार घेऊन कॉ. गोविंद पानसरे उभे राहिले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घेऊन नरेंद्र दाभोलकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार घेऊन एम. एम. कलबुर्गी उभे राहिले होते. मात्र त्यांची हत्या करण्यात आली. हा भारतीय लोकशाहीचा, तुमचा आणि आमचा खून आहे. ही प्रवृत्ती आणि ही परंपरा कायमची संपली पाहिजे. २0१५ मध्ये गोडसेच्या नावाने सोहळे साजरे केले जात आहेत. ही गोष्ट हिंदूंचा उन्माद बाळगणाऱ्या लोकांसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही. खुनी सनातनी संस्कृतीचा सर्वकालीन धिक्कार करायला हवा. सरकारच्या संवेदना का संपल्या आणि कोणी मारल्या, हे आपणास कळेनासे झाले आहे. हे वातावरण चांगले नाही. महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधण्याचा आणि त्यांची वाटणी करण्याचा प्रकार थांबणार का? जाती आणि धर्माच्या पलीकडचे विचार आपण कधी आत्मसात करणार आहोत की नाही? जातीच्या पलीकडे माणूस आहे की नाही? कलेला कधी जात आणि धर्म नसतो. तसे असते तर बिसमिल्ला खाँसाहेबांची शहनाई प्रत्येकजाती-धर्माच्या सोहळ्यामध्ये वाजली नसती. कला आणि संस्कृतीला अशा बंधनात बांधणेही चुकीचे आहे. कलेला, सौंदर्याला आणि विचारांना वैश्विक व्यापकता आहे. चुकीच्या प्रवृत्तींना भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी उत्तर दिले पाहिजे. हे विचारच भविष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकतात. विधायक विचार, विधायक संस्कृती आणि समता, बंधुता जपणारी परंपरा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय सुहास पाटील यांनी करून दिला. यावेळी उपप्राचार्य पद्मजा चौगुले, मुख्याध्यापिका मीनाक्षी वाजे, गणपती कुंभार, निर्मलकुमार सगरे आणि विद्यार्थी प्रणव विजय चव्हाण यांना सबनीस यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. व्ही. बी. कोडग, अ‍ॅड. विजयकुमार सकळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘इसिस’चा धोका : चिंतेचा विषयपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे कुचकामी नेतृत्व आहे. भविष्यात याठिकाणची सत्ता लष्कराच्या हाती जाईल आणि चुकून लष्कराची अण्वस्त्रे लष्कर-ए-तोयबा किंवा ‘इसिस’सारख्या संघटनांच्या हाती गेली, तर जगाचा एकतृतियांश भाग कायमचा संपुष्टात येईल. म्हणून जागतिक पातळीवर इसिस व अन्य दहशतवादी प्रवृत्तींचा धोका सर्वांनाच आहे, असे मतही सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.