ते म्हणाले, २०१९-२० सालात जास्त साखर उताऱ्याच्या भागात तांत्रिक क्षमतेचा द्वितीय पुरस्कार प्राप्त करणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीही कारखान्याने देश आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
कारखान्याने मागील गळीत हंगामात कमीत कमी दिवसांत जास्तीत जात गाळप करून तसेच चांगला साखर उतारा मिळविला आहे. तसेच साखरेची गुणवत्ता चांगली ठेवत पाणी, वाफ आणि वीज यांची बचत करून प्रदूषणही नियंत्रित केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून फेडरेशनने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा २६ मार्च रोजी वडोदरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेमिनारप्रसंगी मान्यवारांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, आशिष चव्हाण, किरण पाटील, वसंत लाड, शामराव जाधव, वीरेंद्र देशमुख, महादेव माने, दिलीप पार्लेकर, विलास जाधव, सागर पाटील, विश्वास लाड, अविनाश लाड, शरद फाटक आदी उपस्थित होते.
फोटो-अरुण लाड