शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेकडे केंद्र-राज्य सरकारकडून डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 12:56 AM

विनायकराव पाटील : दूध व्यवसायावर परिणामाची भीती

इस्लामपूर : केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या १७ हजार ३३४ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेकडे केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारने दुर्लक्षित केले आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे पुढे या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप राज्य दूध उत्पादक कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केला. राजारामबापू दूध संघाच्या कार्यस्थळावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. विनायकराव पाटील म्हणाले, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देशातील दुग्ध व्यवसाय उर्जितावस्थेत येण्यासाठी ही योजना अमलात आणली होती. २०११ मध्ये पुढील दहा वर्षांचा विचार करून शरद पवार यांनी जागतिक बॅँकेच्या सहकार्याने ही योजना बनवली होती. दूध उत्पादन क्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला चालना देणे, कृत्रिम गर्भधारणेसाठी उच्चतम दर्जाच्या सुविधा पुरवणे, दूध वाढीसाठी आहाराचे महत्त्व उत्पादकांना पटवून देणे यासह उच्च दर्जाचे चारा बियाणे करण्याचा अंतर्भाव या योजनेत आहे. पाटील म्हणाले, देशातील सर्व राज्य सरकारे, त्या राज्यातील दूध महासंघ आणि राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाशी चर्चा करून खा. शरद पवार यांनी हा आराखडा तयार केला. राष्ट्रीय दुग्ध संवर्धन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ८ ते १० हजार कोटी रुपयांच्या निधी वाटपासंदर्भात इतर राज्यांनी नियोजन केले आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यमान सहकार आणि महानंदमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने राज्याला या योजनेतील निधी मिळण्याबाबत साशंकता आहे. हा निधी न मिळाल्यास त्याचा राज्यातील दूध व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यासाठी राज्य दूध उत्पादक कृती समितीच्यावतीने शरद पवार यांची भेट घेऊन याप्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक उदयबापू पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)