इस्लामपूर : राजारामनगर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियंत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडोयुनिव्हर्सल कार्पोरेशनच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्पर्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये आकाश अशोक महाजन प्रथम पुरस्कार, तृतीय वर्ष बी.टेक., दिग्विजय महामुनी प्रथम पुरस्कार, व्दितीय वर्ष बी. टेक., शंतनू बोकी व्दितीय पुरस्कार, प्रथम वर्ष बी. टेक. या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी विभागाचे आहेत. साक्षी दिलीप पाटील, व्दितीय पुरस्कार, अंतिम वर्ष बी. टेक., इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन्स विभागाची विद्यार्थिनी आहेत. महाविद्यालयाच्या संचालिका, डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ललितकुमार जुगुलकर, प्रा. मनोज पाटील यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.