शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

Sangli Politics: जयंत पाटील यांच्या मौनात आगामी राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी, कार्यकर्ते संभ्रमात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 4:40 PM

समर्थक, पदाधिकाऱ्यांनीही घेतली सावध भूमिका

अशोक पाटीलइस्लामपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सत्ताधारी गटात जयंत पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला होता. आता तेच अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून जयंत पाटील यांनी स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत मौन बाळगले आहे. त्यांचे हे मौन भविष्यातील राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची संपूर्ण धुरा आता जयंत पाटील यांच्या खांद्यावर आहे. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जयंत पाटील यांच्या भूमिका राजकीय पटलावर रहस्यपूर्णच ठरल्या. मौन बाळगून योग्य वेळी ‘कार्यक्रम’ करण्यात ते पारंगत असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी कोणालाच अचूक अंदाज बांधता आला नाही. जयंत पाटील यांनीही या विषयावर बाेलणे टाळणे पसंत केले.लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण असणार, यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, यावर जयंत पाटील यांनी कधीच स्पष्ट भाष्य केले नाही. योग्य वेळी आपण त्यावर बोलू, अशी मोजकी प्रतिक्रिया देऊन त्यांनी विषय टाळले आहेत.हातकणंगले मतदारसंघाच्या दोऱ्या अजूनही जयंत पाटील यांच्याच हाती आहेत. तरीही या मतदारसंघातील उमेदवारीबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांचे समर्थकही सध्या मौन बाळगण्यात धन्यता मानत आहेत. तरीही पक्षांतर्गत त्यांच्या भूमिकेबाबत दबक्या आवाजात ऊलटसुलट चर्चा सुरुच आहे.

उमेदवारी जाहीर होताच भूमिका स्पष्टहातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती व इंडिया आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित नाहीत. उमेदवारीच्या निर्णयाचा अंदाज घेण्याचे काम सध्या जयंत पाटील यांच्याकडून सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील