सांगली : युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी व जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी शुक्रवारी जाहीर केल्या. यामध्ये राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांच्या वाळव्या तालुक्याची सर्वाधिक छाप पडली आहे. कार्यकारिणीत सर्वाधिक १५ पदे या तालुक्याला मिळाली आहेत. पदांच्या शर्यतीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघाला १३ पदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मिरज, पलूस या तालुक्यांचा क्रमांक आहे. संदीप पाटील (वाळवा), वैभव पवार (कडेगाव), संतोष पवार (कवठेमहांकाळ), परशुराम नागरगोजे (मिरज), धर्मवीर गायकवाड (पलूस), संदीप तांबवेकर, शिवाजी पाटील, सतीश माळी (सर्व वाळवा) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सचिवपदी भारत देशमुख (मिरज), सरचिटणीसपदी अजित बारवडे (वाळवा), राजेश पाटील (तासगाव), अमोल घबक (वाळवा), रवींद्र कदम (मिरज), अविनाश सावंत (जत), महेश नवले (पलूस), कुमार पाटील (वाळवा) यांची, तसेच प्रवक्तेपदी प्रशांत पाटील, खजिनदारपदी शैलेश पाटील (वाळवा), चिटणीसपदी रूपेश पाटील (आटपाडी), छन्नुसिंग पाटील (वाळवा), संघटकपदी ब्रह्मानंद पाटील (वाळवा), राहुल पाटील (वाळवा), अविनाश यमगर (कवठेमहांकाळ), सागर माने (खानापूर), दीपक उनउने (तासगाव), प्रमोद शिंदे (पलूस), भास्कर जाधव (कडेगाव) यांची निवड करण्यात आली आहे. वाळवा तालुकाध्यक्षपदी संजय पाटील, आष्टा शहराध्यक्षपदी अनिल पाटील, तासगाव तालुकाध्यक्षपदी रामचंद्र पवार, तालुका कार्याध्यक्षपदी सलमान मुजावर, शहराध्यक्षपदी कमलेश तांबवेकर, पलूस तालुकाध्यक्षपदी विनायक महडिक, कडेगाव तालुकाध्यक्षपदी जहांगीरहुसेन मुल्ला, जत तालुकाध्यक्षपदी उत्तम चव्हाण, शहराध्यक्षपदी किरण बिरजगी, आटपाडी तालुकाध्यक्ष म्हणून ऋषिकेश बाळासाहेब देशमुख, मिरज तालुकाध्यक्षपदी अमोल पाटील, खानापूर तालुकाध्यक्ष म्हणून अजित जाधव, शिराळा तालुकाध्यक्ष म्हणून राहुल पवार, तर उपाध्यक्षपदी हर्षद माने, बाबा गोळे यांच्या निवडी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)पद नियुक्तीवरून वादयुवकच्या विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादीअंतर्गत वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात कमलाकर पाटील म्हणाले की, शरद लाड यांनी बेकायदेशीररित्या या पदावर राहुल पवार यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी निवडीचे अधिकार माझे आहेत. माझ्या अधिकारात लाड यांनी ढवळाढवळ केली आहे. नव्याने या पदाची निवड आम्ही करणार आहोत. तालुकानिहाय पदे... वाळवा १५, तासगाव ८, कवठेमहांकाळ ५, मिरज ५, पलूस ५, जत ३, आटपाडी ३, खानापूर ३, शिराळा ३, कडेगाव ३
‘राष्ट्रवादी युवक’वर वाळव्याची छाप
By admin | Published: April 22, 2016 10:50 PM