शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

राष्टÑवादीची ढकलगाडी, कॉँग्रेसची बैलगाडी-- स्वतंत्र आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:11 PM

सांगली : इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवारी कॉँगे्रसने ‘बैलगाडी’, तर राष्टÑवादीने ‘ढकलगाडी’ मोर्चा काढून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देइंधन दरवाढीबद्दल केंद्र, राज्य शासनाचा निषेध,कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनेसध्या पेट्रोलचा दर क्रुड आॅईलच्या दराचा विचार करता ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर असायला हवा होता

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवारी कॉँगे्रसने ‘बैलगाडी’, तर राष्टÑवादीने ‘ढकलगाडी’ मोर्चा काढून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. दरवाढ मागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

कॉँग्रेसचा मोर्चा झुलेलाल चौकातून शास्त्री चौकापर्यंत आला. याठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. एका बैलगाडीत मोटारसायकल टाकून इंधन दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला. ‘मोदीजी आता तुमच्यावर जनतेचा भरोसा हाय का? असा सवाल व्यक्त करणारे फलकही झळकविण्यात आले. झुलेलाल चौकातील एका सभागृहात मोर्चापूर्वी कॉँग्रेसची सभा पार पडली.

या सभेत कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सध्या राज्यात पेट्रोलचा दर ८० रुपये, तर डिझेलचा दर ६२.३६ इतका आहे. अडीच महिन्यात पेट्रोलच्या दरात १६ रुपये, तर डिझेल दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका सामान्य लोकांना बसत आहे. कॉँग्रेसच्या काळात १०५ डॉलर प्रति बॅरेल क्रुड आईलचा दर असताना पेट्रोलचा दर ६० रुपये प्रतिलिटर होता. आता भाजपच्या काळात क्रुड आॅईलचे दर ५० डॉलर प्रति बॅरेल असताना पेट्रोलचा दर मात्र ८० रुपयांच्या घरात गेला आहे. इंधन दरवाढीतून सरकारला मोठे घबाड लागले आहे. सध्या पेट्रोलचा दर क्रुड आॅईलच्या दराचा विचार करता ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर असायला हवा होता, मात्र दर वाढतच चालले आहेत.

राज्य शासनानेही भरीस भर म्हणून या दरात आणखी वाढ केली आहे. अन्य राज्यांचा विचार केला, तर दिल्लीत ७०, कोलकाता ७३, चेन्नई ७२, गोवा ६४ रुपये आणि कर्नाटकात ७१ रुपये पेट्रोल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने महाराष्टÑात हाच दर ८० रुपयांच्या घरात आहे.यावेळी नगरसेवक राजेश नाईक, शेवंता वाघमारे, पुष्पलता पाटील, मंगेश चव्हाण, करीमभाई मेस्त्री, रवी खराडे, निसार संगतरास, अल्ताफ शिकलगार, किरणराज कांबळे, पैगंबर शेख, राजन पिराळे, जावेद शेख, रावसाहेब माणकापुरे, बी. जी. बनसोडे आदी सहभागी झाले होते.राष्टÑवादीचे आंदोलन : जिल्हाधिकाºयांना निवेदनराष्टÑवादीच्या शहर जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने ढकलगाडी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आंदोलनकर्त्यांनी त्यांची दुचाकी वाहने ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेली. जिल्हाधिकाºयांना त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरात जी वाढ केली आहे, ती अन्यायी आहे. सामान्य माणसांना या दरवाढीने जगणे मुश्किल झाले आहे. सामान्य व गोरगरीब जनतेचा विचार न करणाºया शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात युवक राष्टÑवादीचे अध्यक्ष राहुल पवार, संदीप व्हनमाने, मोहसीन सय्यद, कैस शेख, परवेज मुलाणी, अनिल जाधव, अजिंक्य पाटील, सुमित ढेरे, डॉ. शुभम जाधव, विशाल हिप्परकर, पंकज बनसोडे आदी सहभागी झाले होते.केंद्रीय मंत्र्यांचा निषेधकेंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी इंधन दरवाढीसंदर्भात मत मांडताना, या दरवाढीने सामान्य जनता उपाशी राहणार नसल्याचे वक्तव्य केले होते. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी या वक्तव्याचा निषेध केला. असंवेदनशील सरकारमधील असंवेदनशील मंत्र्यांना आवर घालण्याची मागणी करण्यात आली.