शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

बुद्ध पौर्णिमेला मिळणार निसर्गानुभव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 3:54 PM

जंगलातील मचाणावर बसून निसर्गप्रेमींना थरारक अनुभव घेता येणार

विकास शहाशिराळा : सामान्य नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून निसर्गाची अनुभूती घेता यावी, तेथे राहाणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांचे मनसोक्त दर्शन घेता यावे, वन्य पशुपक्ष्यांची त्यांच्याच घरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खुणांद्वारे ओळख पटविता यावी, रात्रीचे जंगल, वन्यप्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणूक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे.५ मे बुद्धपौर्णिमेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या परिक्षेत्रांतील जंगलातील ६०हून अधिक मचाणावर बसून निसर्गप्रेमींना अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेता येणार आहे. सामान्य लोकांना वने व वन्यजीव यांच्याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने वनविभागात मागील काही वर्षांपासून ‘निसर्गानुभव’ कार्यक्रम’सुरू केला आला. जंगलातील नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्याजवळ मचाण बांधले आहेत. यात सहभागी होण्यासाठी २५ पासून ३० एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.  पंधरा नद्यांचा उगमदि. ५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ११६५.५७ चौ. किमी आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. १५ नद्यांचा उगम या जंगलातून होतो.जैवविविधतेचा खजिनासह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. येथील जैवविविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प आहे. सस्तन प्राण्यांच्या ३८, पक्ष्यांच्या २४४, फुलपाखरांच्या १२० उभयचरांच्या २२, परिसृपांच्या ४४, गोड्या पाण्यातील मासे ५० आणि वनस्पतींच्या १४५२ प्रजाती येथे आढळून येतात.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग