सांगलीत रोटरी क्लबमध्ये प्रा. संजय ठिगळे यांचे व्याख्यान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विकासाच्या चुकीच्या कल्पनांमुळे माणसाची निसर्गाशी आणि मातीशी नाळ तुटत चालल्याचे प्रतिपादन प्रा. संजय ठिगळे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनतर्फे प्रा. ठिगळे यांचे ‘चला निसर्गाशी नाते जोडू या’ विषयावर रोटरी हॉलमध्ये व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र लंबे होते. धर्मेंद्र खिलारे यांनी स्वागत केले.
प्रा. संजय ठिगळे म्हणाले, भौतिक सुखाच्या हव्यासापोटी माणसाला निसर्ग व्यवस्थेचा विसर पडला. त्यामुळे अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. लोक निसर्गात गेल्यावर भिकाऱ्यासारखे वागतात. त्याला ओरबाडण्याचा प्रयत्न करतात. आता निसर्गाने मला काय दिले यापेक्षा मी निसर्गाला काय दिले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माणूस व निसर्ग या नात्यातील कोंडी केव्हा फुटणार हा गंभीर विषय आहे.
-------