शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

पलूसमधील नवोदय विद्यालय वादग्रस्तच!

By admin | Published: December 09, 2014 11:43 PM

विद्यार्थी, पालकांत अस्वस्थता : दर्जेदार प्रशासन हवे

आर. एन. बुरांडे -पलूस  भारत सरकारने १९८६ या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५९८ जवाहर नवोदय विद्यालये देशात सुरू केली आहेत. पलूस (जि. सांगली) येथे १९९१ मध्ये जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले.या विद्यालयात इयत्ता सहावीत निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. शिक्षणाचे माध्यम इयत्ता ८ वीपर्यंत मातृभाषा किंवा विभागीय भाषा असून, त्यानंतर गणित, विज्ञान व इंग्रजी भाषेतून आणि समाजशास्त्र हिंदी भाषेतून शिकविण्यात येते आणि हे विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १0 वी व १२ वीच्या परीक्षांना बसतात.या विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, गणवेश, निवास आणि वह्या-पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते. विशेषत: ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.पलूसमधील जवाहर नवोदय विद्यालय भव्य व सुंदर इमारतीमध्ये असून, संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. परंतु निसर्गरम्य व सुंदर इमारतीत मुलाला पाठविले म्हणजे त्याचे शिक्षण चांगल्याप्रकारे होते, असे म्हणणे धाडसाचे होईल. कारण त्या विद्यालयाचे प्रशासनही अत्यंत दर्जेदार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.पलूसच्या नवोदय विद्यालयाला जे प्राचार्य लाभतात, त्यांच्या वागण्याच्या पध्दतीवरून त्या विद्यालयाचा दर्जा ठरतो. या विद्यालयाच्या २३ वर्षांच्या कालावधित अनेक वादग्रस्त प्राचार्य होऊन गेले, तर काही चांगलेसुध्दा आले. गेल्या काही वर्षात या नवोदय विद्यालयाचा दर्जा खालावला होता. रॅगिंगचे प्रकार कधी नव्हे ते सुरू झाले होते. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या समजण्यापलीकडे असलेले हे प्रकार त्यांना घाबरवून टाकत होते. तसेच जेवणाचा दर्जा सुध्दा चांगला नव्हता. या सर्व प्रकारामुळे आपल्याला त्रास होईल, म्हणून मुले पालकांना सांगत नव्हती आणि पालक आपल्या मुलांना नवोदय विद्यालयात त्रास होईल म्हणून गप्प बसत असत.आपल्या पोटच्या गोळ्याला सर्वांपासून तोडून संपूर्ण अनोळखी जगात पाठवून आपण आपल्या मुलांच्या सर्वोत्कृष्ट शिक्षणाची सोय केली, याची शेखी मिरवत काही पालक धन्यता मानतात. परंतु आपला मुलगा कोणत्या दिव्यातून जातोय, याचा विचार असे पालक करताना दिसत नाहीत.सचिन जावीर याने विद्यालयात काही ११ व १२ वीचे विद्यार्थी कसे त्रास देतात, हे आपल्या वहीत लिहून ठेवले होते. परंतु त्याच्या वडिलांनी त्याची दखल वेळेत घेतली असती, तर रॅगिंगमुळे आत्महत्या झाली नसती. दुसऱ्या एका गोष्टीचा येथे विचार केला पाहिजे की, सचिन जावीर हा इ. ९ वीमध्ये प्रवेश घेऊन विद्यालयात आला होता. एकदम केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम समोर आल्याने आणि तोही इंग्रजी आणि हिंदी भाषेत असल्याने त्याने हाय खाल्ली. हे त्याच्या गुणावरून समजते. त्याला पहिल्या सत्रात मिळालेले गुण इंग्रजी ७१/९0, हिंदी ८२/१00, मराठी ८२/१00, गणित ३३/१00, सायन्स ३६/१00, सामाजिक शास्त्र ४४/१00 यावरून त्याला गणित, सायन्स आणि सामाजिक शास्त्रात एकदम कमी गुण मिळाल्याचे दिसते. म्हणून तो मित्रांना केंद्रीय बोर्डाची परीक्षा आपणाला अवघड जाणार म्हणत होता. त्यामुळे नाराज होऊन त्याने हे कृत्य केले असावे, असाही विचार करणे भाग पडत आहे.येथे दीड वर्षापासून कार्यरत असलेले अशोक साळी हे कार्यक्षम प्राचार्य असून, उत्तम प्रकारचे प्रशासन त्यांनी आणले आहे. खालावलेला दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ही घटना घडली आहे. यामुळे नवोदय विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाचा हळूवार विचार करून त्यांना मानसिक धीर देण्यासाठी प्रत्येक जवाहर विद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. (वार्ताहर)समुपदेशकाच्या नेमणुकीची मागणीगेल्या काही वर्षात या नवोदय विद्यालयाचा दर्जा खालावला होता. रॅगिंगचे प्रकार कधी नव्हे ते सुरू झाले होते. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या समजण्यापलीकडे असलेले हे प्रकार त्यांना घाबरवून टाकत होते. तसेच जेवणाचा दर्जासुध्दा चांगला नव्हता. या सर्व प्रकारामुळे आपल्याला त्रास होईल, म्हणून मुले पालकांना सांगत नव्हती आणि पालक आपल्या मुलांना नवोदय विद्यालयात त्रास होईल म्हणून गप्प बसत असत. पण आता घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खालावले असून, त्यांना मानसिक धीर देण्यासाठी प्रत्येक जवाहर विद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.