पलूस : पलूस या सधन व राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तालुक्यात काँग्रेससमोर राष्ट्रवादी-भाजप युतीचे आव्हान आहे. पलूस तालुका हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी व भाजपने युती केल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण काँग्रेसने तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याने जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहील, असे चित्र तालुक्यात दिसत आहे. तसेच कुंडल जिल्हा परिषद गटात डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड (काँगे्रस) व क्रांती उद्योग समूहाचे संस्थापक अरूण लाड यांचे पुत्र शरद लाड (राष्ट्रवादी) यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. कुंडल गट : महेंद्र लाड (काँगे्रस), शरद लाड (राष्ट्रवादी), रामचंद्र लाड (कम्युनिस्ट), तर पंचायत समितीसाठी प्रशांत पवार (काँगे्रस), अरूण पवार (राष्ट्रवादी), वैभव पवार (कम्युनिस्ट) अशी तिरंगी लढत होणार आहे. बांबवडे पं. स. साठी प्रतिभा भंडारे (काँगे्रस), मंगल भंडारे (राष्ट्रवादी) असा दुरंगी सामना होणार आहे. दुधोंडी गटात अंजली सावंत (काँगे्रस), अश्विनी पाटील (भाजप), तर शिवसेनेच्या आशा गायकवाड अशी तिरंगी अटीतटीची लढत होणार आहे, तर पं. स.साठी दुधोंडी गटातून प्रवीण पाटील (काँग्रेस), रामचंद्र वरूडे (भाजप), तर रामानंदनगर गणात काँग्रेसचे क्रांतिकुमार जाधव, दीपक मोहिते (भाजप) व शिवसेनेचे राजेंद्र माने अशी तिरंगी लढत होणार आहे. अंकलखोप जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हणमंत पाटील, नितीन नवले (भाजप), तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयकुमार कोले अशी तिरंगी लढत होणार आहे. पंचायत समितीसाठी अंकलखोपला काँग्रेसच्या वंदना माने, भाजपच्या सीमा मांगलेकर, तर आमणापूर गणातून काँग्रेसच्या भाग्यश्री चौगुले भाजपच्या सुनीता पाटील, तर अपक्ष प्रभावती तावदर अशी लढत होणार आहे. भिलवडी गणातून जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संग्राम पाटील, सुरेंद्र वाळवेकर यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे, तर पंचायत समितीसाठी काँग्रेसच्या सुजाता माळी, तर भाजपच्या आरती तावरे यांच्यात लढत होत आहे. वसगडे पंचायत समितीसाठी काँग्रेसचे अमोल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, तर शिवसेनेचे मारूती जाधव अशी लढत होणार आहे. (वार्ताहर)
काँग्रेससमोर राष्ट्रवादी-भाजप
By admin | Published: February 16, 2017 11:20 PM