राज्य सरकारला सत्तेची मस्ती, अजित पवारांची सडकून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:45 PM2023-01-20T18:45:33+5:302023-01-20T18:50:08+5:30

कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व :५० खोके सरकार ओके'  अशा पध्दतीने

NCP leader Ajit Pawar attacked the Shinde-Fadnavis government | राज्य सरकारला सत्तेची मस्ती, अजित पवारांची सडकून टीका 

राज्य सरकारला सत्तेची मस्ती, अजित पवारांची सडकून टीका 

Next

दत्ता पाटील

तासगाव : राज्य सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. पक्षांतर बंदी कायद्यालाही तिलांजली दिली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे पवार म्हणाले. 

आरवडे(ता. तासगाव) येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, " आम्ही आर. आर. पाटील अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण आम्ही असं कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व :५० खोके सरकार ओके'  अशा पध्दतीने सुरू आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येत आहे.

सरकारचं कारभार बेताल  सुरू आहे. छत्रपतींच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात. सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत.त्यांना लाज, लज्जा शरम आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संबोधून मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून टुकारपणा चालू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.

ते पुढे म्हणाले, "राज्याच्या मंत्री मंडळात एक पण महिला नाही, तुमच्या पोटात दुखतं का? महिलांना का घेत नाही? विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे." मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांना मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले.  सत्ताधाऱ्यांना  मंत्रिमंडळ विस्तार करण्याची भीती वाटत आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.

केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी यावेळी सडकून टीका केली. केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशचा फायदा केला. आम्ही ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला, तर राज्याच्या शेतकऱ्यांना 600 रूपये अधिकचा दर मिळेल, पण आमच्या शेतकऱ्यांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत असल्याची टीका केली.

आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा  

यावेळी अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. आर. आर. पाटील यांच्याबरोबर काम करताना ते नेहमी या भागाची काळजी करत असत. तसेच या भागातला पाणी मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे. त्यांच्या आग्रहामुळे आम्ही विविध खात्यात काम करत असताना मोठ्या प्रमाणात निधी पाणी योजनांना दिला. आर. आर. पाटलांनी ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान यासारखे अभियान सुरू केले अशा शब्दांत आबांच्या आठवणीना उजाळा दिला.

Web Title: NCP leader Ajit Pawar attacked the Shinde-Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.