शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राष्ट्रवादी-मित्रपक्षांचे सरकार आणू : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 12:13 AM

इस्लामपूर : राज्यात जातीयवादी सरकार सत्तेवर आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करताना राज्यात पुन्हा समता अन् सर्वसामान्य बहुजन समाजाचा सन्मान करणारे राष्ट्रवादी- काँग्रेस आणि मित्र पक्षां चे सरकार आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील ...

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर इस्लामपुरात जल्लोषी स्वागत

इस्लामपूर : राज्यात जातीयवादी सरकार सत्तेवर आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करताना राज्यात पुन्हा समता अन् सर्वसामान्य बहुजन समाजाचा सन्मान करणारे राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मित्र पक्षांचे सरकार आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.आमदार पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर इस्लामपूर शहरात बँड-बेंजो, ढोल-ताशांचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत झाले. शेकडो आकर्षक स्वागत कमानी व भव्य मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले.ते म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि सर्वच नेत्यांनी माझी एकमताने निवड केली. प्रतिकूल परिस्थिती असताना ही जबाबदारी आली आहे. गेल्या तीस वर्षांपासून मला ताकद देणाऱ्या तुम्हा सर्वांच्या बळावर राज्यात राष्ट्रवादीला भक्कम करणार आहे. देशात अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय सुरु आहे. जातीय भावनांचा उद्रेक करून सत्ता टिकवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने वाटचाल करून जनतेचा विश्वास संपादन करू. राज्यातील जनतेला पुन्हा एकदा स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध राहू.आ. पाटील यांच्या स्वागतासाठी लोक दुपारी ५ पासूनच इस्लामपूर पंचायत समिती परिसरात जमा होऊ लागले होते. आ. पाटील यांची उघड्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लाम्मा चौकातून कचेरी चौकात आली. या मार्गावरील रस्तेनगर्दीने फुलून गेले होते. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, दिलीपराव पाटील, विजय पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, शहाजी पाटील होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले.यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, विनायक पाटील, प्रा. शामराव पाटील, जनार्दन पाटील, विष्णुपंत शिंदे, विजयभाऊ पाटील, भीमराव पाटील, सभापती विश्वासराव पाटील, सभापती सचिन हुलवान, नेताजी पाटील, कृष्णाचे संचालक संजय पाटील, देवराज पाटील, चिमण डांगे, पीरअली पुणेकर आदी उपस्थित होते.विक्रम पाटील यांना दिल्या शुभेच्छामिरवणूक संभाजी चौकात आली असता भाजपचे विक्रम पाटील भाजपचे उपाध्यक्ष सोमनाथ फल्ले यांच्या दुकानात बसले होते. जयंत पाटील यांनी त्यांना बोलावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पंचायत समिती आवारात कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्याने चोरट्यांनी हात धुऊन घेतले. काही नेत्यांच्या मोबाईल आणि रोख रकमेवर हात मारला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस