राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली म्हैसाळ ग्रामस्थांची भेटजयंत पाटील, सुमनताई पाटील यांनी केली चर्चासांगली : संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडप्रकरणी म्हैसाळ येथील ग्रामस्थांची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील आणि स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी सोमवारी सकाळी भेट घेतली. यावेळी या आमदारद्वयींनी ग्रामस्थांशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. ग्रामस्थांनी यावेळी सत्ताधारी मंत्री आणि आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. भ्रूण हत्याकांडप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह आणखी दोन एजंटांना पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. संदीप विलास जाधव (वय ३२, रा. शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि वीरगोंडा ऊर्फ बंडू रावसाहेब गोमटे (३९, कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हैसाळ परिसरात पुरलेले १९ रुग्ण सापडले होते.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली म्हैसाळ ग्रामस्थांची भेट
By admin | Published: March 13, 2017 12:14 PM