इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगरपालिका आवारात शहरातील अन्यायकारक वाढीव घरपट्टीच्या बिलांची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला. वाढीव घरपट्टी तातडीने कमी करावी, अन्यथा नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करताना, आता आम्ही शहरातील नागरिकांची वाढीव घरपट्टी कमी केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, बशीर मुल्ला, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
शहराध्यक्ष पाटील म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूर्वी शहराच्या विकासाला गती देताना कधीही घरपट्टी वाढविली नाही. मात्र आताच्या वाढीव घरपट्टीचे पाप सत्ताधाऱ्यांचेच आहे. नगराध्यक्षांना शहराच्या विकासाला पुढे घेऊन जाता येत नसेल, तसेच वाढीव घरपट्टी कमी करता येत नसेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राज्यात सत्ता येताच जयंत पाटील यांनी शहराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी दिला आहे. नगराध्यक्ष पब्लिसिटीशिवाय काही करत नाहीत.
या आंदोलनात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी, सदानंद पाटील, आयुब हवालदार, रफिक पठाण, शकील जमादार, मोहन भिंगार्डे, गोपाल नागे, मानसिंग पाटील, जुबेर खाटीक, रणजित तेवरे, प्रियांका साळुंखे, शैलजा जाधव, सागर जाधव, अभिजित रासकर, अभिजित कुर्लेकर, अभिजित पाटील, शिवराज पाटील, सागर चव्हाण, संदीप माने, बाळासाहेब कोळेकर, वसंत कुंभार उपस्थित होते.
युवकचे कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांनी आभार मानले.
चौकट
यावर्षी अपील करू नये
ज्या नागरिकांनी गेल्यावर्षी अपील करून ५० टक्के घरपट्टी भरली आहे, त्या नागरिकांनी यावर्षी अपील करू नये. त्यांनी आपली घरपट्टीची बिले ३१ डिसेंबरनंतर भरावीत, असे आवाहन शहाजी पाटील यांनी केले.
फोटो-१४इस्लामपूर०२
फोटो ओळीः
इस्लामपूर नगरपालिकेसमोर वाढीव घरपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, अरुण कांबळे, रोझा किणीकर आदी उपस्थित होते.