Jayant Patil On Rohit Patil ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी रोहित पाटील यांचा विधानसभेला विजय निश्चित असल्याचे म्हणाले. यामुळे रोहित पाटील यांनी महाराष्ट्रातही फिरले पाहिजे, विरोधकांमध्ये आणि रोहित पाटील यांच्यात मोठा फरक असणार असंही जयंत पाटील म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील पाटील यांचा विजयाबाबत भाष्य केले. रोहित पाटील यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरण्याबाबतही भाष्य केले, यामुळे आता विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील राज्यात प्रचारासाठी दौरा काढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आरआर पाटील आबा यांनीही पक्षासाठी याआधी प्रचारसभा घेतल्या होत्या. आबांच्या सभांना राज्यभरातून मोठी मागणी होती. रोहित पाटील यांचीही आरआर आबांसारखीख भाषण करण्याटची पद्धत आहे, त्यामुळे रोहित पाटील यांना निवडणूक काळात राज्यातून मोठी मागणी असल्याचे बोलले जात आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले, आता राज्यात वातावरण बदलले आहे. रोहितदादांनी सांगितले की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आहे. आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल, तुम्ही आता महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही. कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे, तुम्ही त्याची काही चिंता करु नका. तुमची सीट मोजल्यात जमा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की, आपला पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
"सुमन ताईंना अनेकांचा फोन आला"
"आपल्या पक्षातून बरीच लोक बाहेर गेली, काही लोक गेल्यानंतर सुमनताईंना किती फोन येत होते, किती दबाव होता मला माहित आहे. त्या दबावाला बळी पडल्या नाही, त्यांनी पवार साहेब जिथे असतील तिथे आम्ही असणार असं सांगितलं. ही एकनिष्ठता पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
"पूर्वी लोक म्हणायचे यांना उमेदवार मिळणार नाहीत. पण, आता वातावरण बदलले आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन,तीन उमेदवार उमेदवारी मागत आहेत. उद्याची विधानसभा होईल त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
'...आता अधिकारी बोलायला लागले'
"सरकारी अधिकारी आमच्यासोबत आधी बोलायचे नाहीत, आता बोलायला लागलेत.आमच्याशी म्हणजेच कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. कारण आता वारं बदलले आहे. वारं बदलले आहे हे सगळ्यात आधी सरकारी अधिकाऱ्यांना कळते, असंही पाटील म्हणाले.