फोटो ओळ : कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार सुमनताई पाटील, ताजुद्दीन तांबोळी यांनी सत्कार केला.
शिरढोण : राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी सागर सपकाळ, तर कवठेमहांकाळ शहर अध्यक्षपदी बालाजी पवार, जिल्हा संघटकपदी अमृत चव्हाण यांची निवड करण्यात आली.
पालकमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, प्रभारी चैतन्य मानकर, पदवीधर सेलचे प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
निवडीनंतर कवठेमहांकाळ येथे आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, कवठेमहांकाळ शहराध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते.