कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कवठेमहांकाळ तालुकाध्यक्षपदी नारायणराव पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी बुधवारी केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पक्षाचा झेंडा लावण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद गेल्या दहा महिन्यांपासून रिकामे होते. त्यामुळे सुरुवातीलाच शिंदे यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी पवार यांची निवड झाल्याची घोषणा केली.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या या निवडणुका पक्षाच्या चिन्हावरच आणि स्वबळावर लढविण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यात या निवडणुकांमध्ये कुणाबरोबरही युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर लढविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर आपल्या पक्षाचे प्राबल्य असले पाहिजे. जनतेच्या कामाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या महत्त्वपूर्ण असतात. म्हणूनच भविष्यातील या निवडणुकांसाठी पक्षाला बहुमत प्राप्त करुन देण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.तालुक्यातील जनता आर, आर. पाटील आबांचे विचार कधीही विसरणार नाही. उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नंबर वन असेल, असा दावा महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी केला.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, सुरेखा कोळेकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, महेश जाधव, गणेश पाटील यांचीही भाषणे झाली. पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करू, असा विश्वास या मंडळींनी यावेळी दिला.या बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, शंकरराव पाटील, हणमंतराव देसाई, बाळासाहेब पाटील, राहुल पवार, भाऊसाहेब पाटील, दत्ताजीराव पाटील, जगन्नाथ कोळेकर, गणपती सगरे, दीपकराव ओलेकर, प्रा. दादासाहेब ढेरे, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, मनोहर पाटील, संदीप पाटील, चंद्रशेखर सगरे, कल्पना घागरे, गीतांजली माळी, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी सुपने, शंकरराव कदम, बाळासाहेब यादव, नूतन वाघमारे, मन्सूर मुलाणी आदी उपस्थित होते. मोहन खोत यांनी आभार मानले. (वार्ताहर)निवणुकीची तालीमविलासराव शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या या निवडणुका पक्षाच्या चिन्हावरच आणि स्वबळावर लढविण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कुणाबरोबरही युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर लढविण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरच लढणार
By admin | Published: June 29, 2016 11:35 PM