इस्लामपूर : इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लामपूर शहरातील नागरिकांच्या रेशनकार्डसंदर्भातील विविध कामे करून घेण्यासाठी शहरात कॅम्प घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले. शहराध्यक्ष सचिन कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे निवेदन दिले. सबनीस यांनी लवकरच कॅम्प घेऊ, अशी ग्वाही दिली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गेल्या आठवड्यात इस्लामपूर शहरात विविध ठिकाणी संपर्क बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न, अडी-अडचणी समजून घेतल्या. यामध्ये अनेक नागरिकांनी रेशनकार्डसंदर्भात आपले प्रश्न मांडले आहेत. नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे, खराब व गहाळ रेशनकार्ड नव्याने काढणे आदी प्रश्न मांडले आहेत. हे सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅम्पचे आयोजन करावे, अशी निवेदनात मागणी केली आहे. यावेळी अभिजित रासकर, अभिजित पाटील, दिग्विजय पाटील, सागर जाधव, तन्वीर चाऊस, दादा सूर्यवंशी, अंकुश जाधव, निखिल देसाई, मिलिंद पाटील, पवन पाटील, अल्ताफ जमादार उपस्थित होते.
फोटो : २९१२२०२०-आयएसएलएम-राष्ट्रवादी न्यज
ओळी : इस्लामपूर येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी यांनी निवेदन दिले. यावेळी अभिजित रासकर, अभिजित पाटील, सागर जाधव, दिग्विजय पाटील उपस्थित होते.