शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

विकासानेच शिराळ्यात राष्ट्रवादीची सत्ता

By admin | Published: June 15, 2017 10:59 PM

विकासानेच शिराळ्यात राष्ट्रवादीची सत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळा शहराचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही केल्यामुळेच मतदार नगरपंचायत निवडणुकीत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच आमची सत्ता शिराळा नगरपंचायतीवर आली, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुनंदा सोनटक्के, तर उपनगराध्यक्षपदी कीर्तीकुमार पाटील यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अ‍ॅड. भगतसिंग नाईक, वीराज नाईक, प्रमोद नाईक, बसवेश्वर शेटे, गौतम पोटे, चंद्रकांत निकम, देवेंद्र पाटील, विश्वास कदम, सम्राटसिंह नाईक उपस्थित होते. मानसिंगराव नाईक म्हणाले, आम्ही शिराळा नगरपंचायत निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली. शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची कामे केली, तसेच सुधारित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अंबामाता मंदिर परिसराचे सुशोभिकरण, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला सुरुवात, भव्य प्रशासकीय इमारत, अद्ययावत पंचायत समिती इमारत तसेच शिराळा बसस्थानक इमारत यासह गावातील कॉँक्रिटीकरण पूर्ण केले. अशी कोट्यवधीची विकास कामे केली. त्यामुळे मतदार आमच्या पाठीशी राहिले. विरोधकांनी स्वत:ची संस्था मोडकळीस आणली. त्यांनी आमदार झाल्यावर मतदार संघात काय विकास केला, हे दिसत आहे. नाईक म्हणाले, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सदस्य यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत. त्यांची कामे करावी. लोकांची सेवा करण्यासाठी आपण आलो आहोत, हे लक्षात ठेवावे.यावेळी संजय हिरवडेकर, संभाजी गायकवाड, विजय दळवी, लालासाहेब पवार, प्रमोद पवार, लालासाहेब तांबीट, गजानन सोनटक्के, प्रताप मुळीक आदी उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी स्वागत केले.