इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कौटुंबिक, आर्थिक, रोजगार अशा अडचणी असह्य होत असल्याने समाजातील आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी जीवनाकडे सकारात्मकपणे पाहायला हवे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालायत मानसशास्त्र विभागाने जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त ‘चला आत्महत्या रोखूया व आनंदी जीवन जगूया’ या विषयावर आयोजित पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. घनश्याम कांबळे उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात तरुण आणि लहान मुले मोबाइलच्या विळख्यात सापडत आहेत. आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, अशा व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक दिशादर्शन करणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. तेजपाल जगताप, डॉ. विजय माळी, डॉ. स्वाती मोरकळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो : १२ इस्लामपूर १
ओळ : इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नितीन शिंदे, डॉ. घनश्याम कांबळे उपस्थित होते.