ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा महाविद्यालय व बुद्धी विकास वाचनालय यांच्यावतीने तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बापूजी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘आजची संस्कारक्षम पिढी घडणे ही काळाची गरज आहे’ या विषयावर त्या बोलत होत्या. पश्चिम महाराष्ट्र सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बबन पाटील उपस्थित होते.
भारती पाटील म्हणाल्या, आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळविण्यासाठी हवी. आयुष्यातील यश हे इतरांच्या तुलनेत आपली परिस्थिती कशी आहे. यावरून मोजता येत नाही. यशस्वी माणसाची स्पर्धा स्वतःशी चालू असते. आयुष्यात आपण किती उंची गाठली यावर यशाचे मोजमाप होत नाही. रोजचा दिवस आपल्यापुढे नवनवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाणवायचे असेल तर स्वतःला संस्कारक्षम घडविले पाहिजे.
प्रा. सुरेश इंगळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. सुवर्णा आवटे यांनी आभार मांनले.
फोटो-१३कुरळप१
फोटो- ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे बापूजी व्याख्यानमालेत भारती पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रताप पाटील, जगन्नाथ शेटे, बाबासाहेब पाटील, बबन पाटील आदी उपस्थित होते.