शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

By admin | Published: March 13, 2016 10:47 PM

सुभाष देशमुख : जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा, शासनाला अहवाल देणार

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी २५० ते २७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. असा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर) यांनी दिली.ते म्हणाले, शासन जत तालुक्यातील चारा व पाणी टंचाईसाठी प्रत्येकवर्षी सर्वसाधारण पाच कोटी रुपये खर्च करत आहे. जो खर्च होईल तो एकदाच होणार आहे. त्यानंतर मात्र चारा व पाणी टंचाई निर्माण होणार नाही. येथील नागरिकांनाही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करावे लागणार नाही. म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी येथील जनतेची भावना आहे. शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी जत शहर व तालुक्यातील बनाळी, वायफळ, अचकनहळ्ळी गावांचा दौरा केला. त्यांच्यासमवेत आ. विलासराव जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, शेतसारा, वीज बिल माफ करावे, पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत, वर्षातून तीनवेळा म्हैसाळ कालव्यातून आवर्तन करावे, वायफळ (ता.जत) पर्यंत कालव्यातून पाणी सोडावे, हवामानावर आधारित पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत आदी मागण्या शेतकऱ्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे केल्या आहेत. भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व प्रमोद सावंत, उमेश सावंत, संजयकुमार सावंत, रमेश साबळे, विलास पाटील, सुरेश शिंदे, शिवाजीराव ताड, बी. आर. सावंत, हेमंत भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)छावणी सुरु करण्याची मानसिकता नाहीचारा छावणी सुरू करण्याची शासनाची मानसिकता नाही. परंतु पशुधन जगविण्यासाठी शासन चारा उपलब्ध करून देणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.