कामेरी : पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एका झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन केले, तरी मोठ्या प्रमाणात झाडे वाढतील. आपोआपच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. रवी यादव यांनी केले. कामेरी-इस्लामपूर रस्त्यालगत दत्त टेकडी परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिराळा वनक्षेत्रपाल परिमंडळ-इस्लामपूर
यांच्यातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
वनविभागाने कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी वनअधिकारी अमोल साठे, जितेंद्र खराडे, दीपाली सागावकर, रायना पाटोळे वनकर्मचारी निवास उगळे, महेश गवाळे, विठ्ठल खोत, युनूस मनेर उपस्थित होते.
फोटो : ०५ कामेरी १
ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथील दत्त टेकडी परिसरात डॉ. रवी यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनअधिकारी अमोल साठे, जितेंद्र खराडे, दीपाली सागावकर, रायना पाटोळे उपस्थित होते.