सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. दि. २० ते २२ एप्रिलअखेर होणाऱ्या या संमेलनात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत.
सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी विश्रामबाग येथील दांडेकर हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला बाळासाहेब देशपांडे यांनी संमेलनाची रूपरेषा व त्याच्या तयारीसाठी करण्यात येणाºया समित्यांची माहिती दिली. त्यानंतर माधवराव कुलकर्णी यांनी समित्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सावरकर प्रतिष्ठान प्रशालेच्या प्रांगणात होणाºया या संमेलनात पहिल्या दिवशी २० एप्रिल रोजी दुपारी चारपासून ग्रंथदिंडी, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेनंतर प्रेरणा लांबे यांचे ‘मी येसुबाई बोलतेय’ या विषयावर, गीता उपासनी यांचे ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास’ या विषयावर आणि शंतनू रिठे यांचे ‘आज सावरकर असते तर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विश्रामबाग येथील शोभायात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी शेखर इनामदार यांनी घेतली, तर गावभाग येथील शोभायात्रेची जबाबदारी भारती दिगडे यांनी घेतली.
मिरज येथील शोभायात्रेसाठी सुधीर गोरे व संजय धामणगावकर यांनी सहकाºयांसह योगदान देणार असल्याचे सांगितले. उर्वरित कार्यक्रम पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहेत.संमेलनामध्ये दोन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहावे, आपल्याबरोबर किमान दोन प्रतिनिधी सहभागी करावेत, संमेलनात युवकांचा सहभाग वाढवावा व निधीच्या संकलनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, संयोजन समितीकडून जी द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली जाईल असे सांगितले. यावेळी बापूसाहेब पुजारी, विलास चौथाई यांच्यासह इतरांनीही आपली मते व्यक्त केली.मंत्री, खासदार, मान्यवरांची उपस्थितीसंमेलनाच्या मुख्य दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तर समारोपाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत. संमेलनास खा. अमर साबळे, प्रदीप रावत, दत्तात्रय शेकटकर, भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, रवींद्र गोयल आदी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी सांगलीतील विश्रामबाग येथे बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेखर इनामदार, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, बाळासाहेब देशपांडे, विलास चौथाई आदी उपस्थित होते.