फोटो ओळ: कुंडल (ता. पलूस) येथे ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणीचे प्रात्यक्षिकाचा प्रारंभ प्रतीक पाटील, आमदार अरुण लाड, शरद लाड, किरण लाड यांच्या उपस्थित करण्यात आला.
पलूस : साखर कारखान्यांनी नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले तर शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर नक्की सुधारेल, यासाठी क्रांती आणि राजारामबापू साखर कारखाना एकमेकांच्या हातात हात घालून इथून पुढे काम करेल अशी ग्वाही प्रतीक जयंत पाटील यांनी दिली.
कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती ड्रोन द्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण लाड अध्यक्षस्थानी होते. क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
शरद लाड म्हणाले, शेतीचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे शेती वाढवू शकत नाही. म्हणून ड्रोन, ठिबक, सबसरफेस ठिबक, ऑटोमायझेशन अशा तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेती केली तर शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढेल.
यावेळी पृथ्वीराज कदम, वसंतभाऊ लाड, किशोर माळी, श्रीकांत लाड, विनायक महाडिक, जयदीप यादव, सुरेश शिंगटे, कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, संचालक रामदास सावंत, दिलीप पाटील, संदीप पवार, नारायण पाटील उपस्थित होते.