आष्टा : शिगाव (ता. वाळवा) येथील निकिता प्रदीप पाटील यांची अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल अशोका ॲग्रोच्या वतीने त्यांचा सत्कार संचालक सतीश पाटील व पोखर्णीच्या सरपंच रेखाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रेखाताई पाटील म्हणाल्या, शिगावसारख्या ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातील निकिता उच्च शिक्षणासाठी विदेशात जात आहे. ही अभिमानास्पद कामगिरी आहे. निकिताच्या यशाने ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणास चालना मिळेल.
सतीश पाटील म्हणाले, प्रदीप पाटील व कुटुंबीयांनी अत्यंत खडतर परिस्थितीत मुलीला उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देऊन स्त्रीशक्तीचा जागर केला आहे.
यावेळी सर्वोदय कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील, सुवर्णा पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.
फोटो : २१ आष्टा १
शिगाव, ता. वाळवा येथील निकिता पाटीलची उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करताना पोखर्णीच्या सरपंच सौ. रेखाताई पाटील, अशोका ॲग्रोचे संचालक सतीश पाटील, नंदकुमार पाटील, सौ. सुवर्णा पाटील, प्रदीप पाटील.