शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

उमदी दुहेरी खून प्रकरण: नऊ आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 6:19 PM

या नऊ संशयित आरोपीना पंढरपूर येथे पकडले. त्यांच्याकडून गुन्हात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीची चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

संख : जत तालुक्यातील उमदी येथे सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचा राग मनात धरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत गुंडू ऊर्फ मदगोंडा नागाप्पा बगली (वय २१), संतोष राजकुमार माळी (२१) या युवकांच्या दुहेरी खुनातील नऊ आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना विजापूर महामार्गावर पादगट्टी ठिकाणी घडली.पूर्व भागातील उमदी मयत गुंडा ऊर्फ मदगोंडा बगली, संतोष राजकुमार माळी, प्रकाश महादेव परगोंड हे वर्गमित्र आहेत. गावात शिवजयंतीचा कार्यक्रमादिवशी स्टेजवर चढण्याच्या कारणावरून सोशल मीडियावर चॅटिंगवरून वाद झाला होता. मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान, दोन्ही गटांत सोशल मीडियाच्या चॅटिंगवरून वाद पुन्हा झाला. रात्री मयत त्याचे मित्र जेवायला गेले होते. शिवजयंतीचा राग मनात धरून संशयित दहा ते बारा जणांनी पाळत ठेवून रात्री ११.३० वाजता घरी येताना काठी, धारधार शस्त्र, दगडाने मारहाण केली.मारहाणीत गुंडा ऊर्फ मदगोंड बगली, संतोष राजकुमार माळी यांच्या पोटावर, अंगावर धारदार शस्त्राचे वार झाले होते. प्रकाश परगोंड जखमी झाले. तिघांना नातेवाईकांनी सोलापूरला उपचारासाठी हलवले. दोघांचा वाटेत मृत्यू झाला. जखमी परगोंडला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, घटनास्थळी भेट दिली. तपासाबाबत मार्गदर्शन केले. तपासाची सूत्र उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्याकडे सोपविली.आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक नेमले. पथकांनी हर्षवर्धन अनिल देशमुख, संदीप तुकाराम भोसले, अक्षय रामचंद्र भिसे, संजय उरफ मल्लिकार्जुन शामराव शिंदे, इंद्रजित यशवंत वाघ, विकास मनोहर भिसे, तेजस्व ऊर्फ यल्लाप्पा गंडाप्पा साळुंखे, मारुती सोमनिंग माळी ( रा. सर्व उमदी), विकास बिराप्पा गुळदगड (वय २४ कुलाळवाडी, ता. जत) या नऊ संशयित आरोपीना पंढरपूर येथे पकडले. त्यांच्याकडून गुन्हात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीची चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.गुरुवारी जत येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर केली असता संशयित आरोपीना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, दुचाकी गाडी, अजून यात कोण सहभागी आहे, खुनाचे नेमके कारण काय, याचा तपास करायचा आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी