सांगली : पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपिकता कायम रहावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनुदानावर ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील चार हजार ७३ लाभार्थींनी लाभ घेऊन अनुदानासाठी २०५-१६ मध्ये प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविले आहेत.
या लाभार्थींचे नऊ कोटी २० लाख थकीत असून, चार वर्षांत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना अभियानांतर्गत राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी केंद्राकडून ८० टक्के व राज्य सरकारकडून २० टक्के खर्च केला जात आहे. ठिबक सिंचन योजनेतंर्गत अल्पभूधारक शेतकºयाला ६०, तर बहुभूधारकाला ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील चार हजार ७३ शेतकºयांनी प्रत्यक्ष ठिबक सिंचन बसवल्यानंतर कृषी कार्यालयाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविले होते. मात्र प्रस्ताव मंजूर होऊन व ठिबक सिंचन बसवूनही शेतकºयांना अनुदान मिळालेले नाही. ही रक्कम तब्बल नऊ कोटी वीस लाख रुपये असल्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
वारंवार शेतकरी अनुदानासाठी शासकीय कार्यालयांकडे फेºया मारुनही त्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शासकीय यंत्रणेच्या या धोरणामुळे योजनेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यातील एक लाखाहून अधिक एकर जमीन क्षारपड झाली आहे. क्षारपड जमिनीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी ठिबक सिंचनकडे वळला आहे. परंतु, सरकारच या शेतकºयांना प्रोत्साहन देण्याऐवजी अनुदान देण्यास टाळाटाळ करून त्यांची आर्थिक कोंडीच केली जात आहे, असा शेतकºयांनी आरोप केला आहे.
शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : पाटीलठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची आर्थिक कोंडी करणे शासनाने बंद करावे. प्रोत्साहन सादर केलेल्या सर्वच शेतकºयांना शासनाने ठिबक सिंचन योजनेचा लाभ दिला पाहिजे. थकीत शेतकºयांना त्वरित अनुदान दिले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी महावीर पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकित अनुदानतालुका शेतकरी संख्याआटपाडी १०७जत ७७२कडेगाव ५७३खानापूर २४३क़वठेमहांकाळ २२०मिरज ७३४पलूस ४२५शिराळा ९३तासगाव ३४३वाळवा ५६३एकूण ४०७३