लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : वड्डी (ता. मिरज) येथील मराठी शाळेतील विलगीकरण केंद्रातील कोरोनामुक्त नऊ जणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनामुक्त रुग्णांना सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवकांच्या हस्ते रोप व फळे देण्यात आली.
यावेळी सरपंच अमिरुन करीमखान वजीर, उपसरपंच रूपाली मगदूम, ग्रामपंचायत सदस्य निसार पाटील, माजी उपसरपंच राजू वजीर, बबन कोळी, प्रकाश नाईक, महेंद्र वाघमारे, छोटू नाईक, संजय फडतरे, अनिल जाधव, रमेश नाईक, महेंद्र नाईक, महेंद्र सातपुते, ग्रामसेवक, पोलीस पाटील आरोग्य विभागाचे डॉ. समीर सनदी, शहाणाकाकू नाईक अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते. अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मानधनाचे धनादेश देण्यात आले. यावेळी माजी सरपंच करीमखान वजीर, मारुती नाईक, डाॅ. समीर सनदी, कोरोनामुक्त झालेले सचिन कांबळे, राहुल फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले. विलगीकरण केंद्रातील तीन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित चार रुग्णही कोरोनामुक्त झाले असून चार दिवसात त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. विलगीकरण केंद्रांत जेवण व चहा नाष्ट्याची सोय करणाऱ्या नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे सरपंच वजीर यांनी आभार मानले.