शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

रेठरे हरणाक्ष-बाेरगावमधुन नऊ महिला इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:20 AM

शिरटे : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटामध्ये रेठरे हरणाक्ष- बोरगाव गटामधून तब्बल नऊ महिला उमेदवार इच्छुक ...

शिरटे : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत

महिला राखीव गटामध्ये रेठरे हरणाक्ष- बोरगाव गटामधून तब्बल नऊ महिला उमेदवार इच्छुक आहेत. काही उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्चित मानून प्रचारास सुरुवात केली आहे, तर काही अजूनही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.

कृष्णाच्या संचालक मंडळात दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यापैकी एक उमेदवारी या गटात मिळणार, हे निश्चित आहे. सहकार पॅनलकडून विद्यमान संचालिका जयश्री माणिकराव पाटील, प्रा. संगीता सुनीता पाटील (बहे), डॉ. किशोरी दीपक मोहिते (बिचूद), संस्थापक पॅनलकडून बहेचे माजी संचालक संभाजी दमामे यांच्या पत्नी मीनाक्षीदेवी संभाजी दमामे, बोरगावचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांच्या पत्नी स्नेहल उदयसिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

रयत पॅनलकडून कृष्णाचे माजी उपाध्यक्ष राजेसाहेब थोरात यांच्या स्नुषा सत्त्वशीला उदयसिंह थोरात, बहे येथील नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांच्या मातोश्री व बहे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सावित्री शिवाजी पाटील, माजी संचालक पैलवान हणमंतराव पाटील-शिरटेकर यांच्या स्नुषा सुरेखा जयकर पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.

कामेरी येथील सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा छायाताई अनिल पाटील यांनी रयतकडून रेठरे हरणाक्ष- बोरगाव गटातून सर्वसाधारण गटातून, तर मीनाक्षीदेवी संभाजी दमामे यांनी संस्थापककडून महिला राखीव व सर्वसाधारण गटातून उमेदवारी मागितली आहे.

लढत दुरंगी की तिरंगी हाेणार, हे अजूनही गुलदस्त्याच आहे. तिन्ही गटांतील सर्वच महिलांना राजकीय वारसा असून, सर्वसाधारणप्रमाणे या गटातील लढतीकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.