शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

‘निर्भया रॅली’ने सांगलीच्या सन्मानात भर!

By admin | Published: October 15, 2016 11:26 PM

सदाभाऊ खोत : सायकल रॅलीस प्रारंभ; जिल्ह्यात सहाशे किलोमीटर करणार प्रवास

सांगली : जिल्हा पोलिस दलाने आयोजित केलेल्या ‘निर्भया सायकल रॅली’च्या माध्यमातून महिलांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन आणि शारीरिक व्यायाम अशी चतुसूत्री साध्य होणार आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय एकात्मता, महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ आॅक्टोबर ते २१ आॅक्टोबरदरम्यान ६०२ किलोमीटर अंतराच्या ‘निर्भया सायकल रॅली’चे आयोजन केले आहे. येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी खोत यांच्याहस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी), सुहास पाटील उपस्थित होेते. खोत म्हणाले, पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे. महिलांचा सन्मान आणि सायकलच्या माध्यमातून प्रदूषण वाढणार नाही, हे हेतू साध्य होतील. तळागाळातील माणसाला पोलिस दल आपल्या सोबत आहे, हा विश्वास निर्माण होईल. पोलिस दलाचीही प्रतिमा उंचावणार आहे. सामान्य माणसाला निर्भयपणे जगता येईल, असा संदेश दिला आहे. पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या कल्पनेतून सांगली जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके तैनात केली आहेत. महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना तसे वातावरण आहे, याची खात्री देणे महत्त्वाचे आहे. २१ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ही रॅली फिरणार आहे. यामध्ये ६९१ जणांनी सहभाग नोंदविला आहे. सायकल रॅलीत माधवनगर (ता. मिरज) येथील गोविंद परांजपे, सांगलीवाडीचे दत्ता पाटील या ज्येष्ठ सायकलपटूंसह अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. १७ शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व जनतेला रॅलीचे महत्त्व सांगितले जाणार आहे. रॅलीच्या रस्त्यावरील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनाही या रॅलीमध्ये सहभागी केले आहे. (प्रतिनिधी) असा असणार सायकल रॅलीचा प्रवास शनिवारी मिरज, कवठेमहांकाळ, जत मार्गे गुड्डापूर हे ११७ किलोमीटर अंतर पार करून गुड्डापूर येथे मुक्काम. रविवारी १६ आॅक्टोबरला गुड्डापूरहून उमदी, जत येथून आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) मुक्काम करुन १२५ किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. १७ आॅक्टोबरला आरेवाडीतून आटपाडी, विटा तासगाव हे १३२ किलोमीटर अंतर पार करणार आहे. तासगाव येथे मुक्काम आहे. १८ आॅक्टोबरला तासगावहून पलूस, सागरेश्वर, देवराष्ट्रे, इस्लामपूरहून शिराळ्याला मुक्काम करणार आहे. हे अंतर ८४ किलोमीटर आहे. १९ आॅक्टोबरला शिराळ्याहून कोकरुड, सोनवडेतून चांदोली येथे मुक्काम आहे. हे अंतर ४० किलोमीटर आहे. २० आॅक्टोबरला चांदोली फॉरेस्ट वाईल्ड लाईफ सॅनेटरी (नेचर ट्रॅक) करून चांदोलीतच मुक्काम आहे. २१ आॅक्टोबरला चांदोलीहून कोकरुड, आष्टा मार्गे १०४ किलोमीटर अंतर पार करून सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात सांगता होणार आहे.