इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. तालुक्यात विरोध वाढत आहे म्हटल्यावर शेतकºयांची कोंडी करण्याचे प्रयत्न आ. पाटील व त्यांच्या बगलबच्चांकडून होत आहेत. शेतकºयांची नवी पिढी दुबळी रहावी, असे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र शेतकरीच आता चोख उत्तर देतील, असा इशारा नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी बुधवारी दिला.
राजारामबापू कारखान्याच्या थकीत एफआरपीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासदांसमवेत घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी रवींद्र पिसाळ, अधिक मोरे, रयत क्रांती आघाडीचे सागर खोत, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते.
रवींद्र पिसाळ म्हणाले, विधानसभेला शेतकºयांची मते चालतात, तर मग साखर कारखान्याचे सभासद का करून घेतले जात नाही? सभासद वाढीसाठी १ आॅगस्टरोजी आष्टा नाका येथील राजारामबापू पुतळा परिसरात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले; तर सागर खोत यांनी, येत्या १० दिवसात एफआरपीची रक्कम न मिळाल्यास साखर आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राजारामबापू कारखान्याच्या तिन्ही युनिटमध्ये २० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यांच्याकडून एफआरपीप्रमाणे जानेवारी १६ पासून ३ हजार ६ रुपयांपैकी थकीत ५०६ रुपयांप्रमाणे १०० कोटी २३ लाख रुपयांची बाकी शेतकºयांना येणे आहे. तसेच एफआरपी अधिक २०० यानुसार ३९ कोटी ६१ लाख रुपये अशी एकूण १३९ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांना मिळायला हवी.
प्रसाद पाटील म्हणाले, ५४ गावांच्या संपर्क दौºयातून जनतेच्या अडीअडचणी समजून घेताना शेतकºयांमध्ये ऊस बिलाच्या प्रश्नावरून प्रचंड असंतोष असल्याचे जाणवले. कायद्याप्रमाणे १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असतानाही ‘राजारामबापू’कडून ५०६ रुपयांची उर्वरित रक्कम अद्यापही दिली गेलेली नाही.