शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
3
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
4
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
5
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
6
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
7
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
8
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
10
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
11
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
12
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
13
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
14
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
15
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
16
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
17
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
18
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
19
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
20
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया

‘दंगल’कार नितीन चंदनशिवे यांना निवासस्थानाच्या चाव्या प्रदान, लोकसहभागातून बांधून दिलं घर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 6:41 PM

घाटनांद्रे : सम्यक परिवर्तन संघाच्या माध्यमातून ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे यांना घर देण्यात आले. कवठेमहांकाळ येथे हा गृहप्रदान सोहळा थाटात ...

घाटनांद्रे : सम्यक परिवर्तन संघाच्या माध्यमातून ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे यांना घर देण्यात आले. कवठेमहांकाळ येथे हा गृहप्रदान सोहळा थाटात पार पडला. उद्योजक सी. आर. सांगलीकर, मठाधिपती तुकाराम महाराज (जत) यांच्या हस्ते व मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा अदाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.सम्यक परिवाराचे प्रमुख प्रा. अर्जुन कर्पे, पुरोगामी चळवळीचे जेष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, पोलीस दलातील संजय पाटील, इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नाट्यगृहात हा साेहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या वेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा अदाटे, मठाधिपती तुकाराम महाराज, उद्योजक सी. आर. सांगलीकर यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ‘संविधान’ नावाच्या वास्तूची फीत कापून चंदनशिवे यांना या वास्तूची किल्ली प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा अदाटे, अॅड वैभव गीते, किशोर दिपंकर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना निवारा बांधून दिल्यानंतर हा लोकसहभागातून घर बांधून देण्याचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले.उद्योजक सी. आर. सांगलीकर म्हणाले, तरुणांनी व्यवसायाकडे, उद्योगाकडे वळले पाहिजे. सम्यक परिवाराने हा राबवलेला सामाजिक उपक्रम स्तुत्य आहे. आपण त्यांच्या पाठीशी राहू.यावेळी कवी सागर काकडे, जित्या जाली, रवी कांबळे, रामहरी वरकले, मोहन गोखले, दयानंद काळे, पी. के. कांबळे यांचे कविसंमेलन पार पडले. किशोर दिपंकर, सुरेखा कांबळे, उत्तम काटे, विक्रम कर्पे, सतीश गाडे, प्रा. अमोल वाघमारे यांनी चळवळीची गाणी गायली.कार्यक्रमास युवा नेते शंतनु सगरे, अॅड वैभव गिते, मच्छिंद्र चव्हाण, राहुल गावडे, डॉ. सुदर्शन घेरडे, अक्षय अहिरे, डॉ. विवेक गुरव, महावीर माने, सुशील कांबळे, प्रशांत ऐदाळे, अक्षय गायकवाड, अजित कारंडे, संजय साबळे, भगवान सोनंद, बोधिसत्व माने, सर्जेराव खरात, बाळासाहेब सरवदे, रवी चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली