शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सांगली महामार्ग सफरीचे नितीन गडकरींना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:12 PM

सांगली : मुंबई-गोवा महामार्गाची लाज वाटते, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना येथील नागरिक जागृती मंचने सांगलीतील महामार्ग सफरीचे निमंत्रण दिले आहे. त्या महामार्गाची लाज वाटते, तर सांगलीतील महामार्गांचा अभिमान वाटतो का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याबाबत सोशल मीडियावर ...

सांगली : मुंबई-गोवा महामार्गाची लाज वाटते, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना येथील नागरिक जागृती मंचने सांगलीतील महामार्ग सफरीचे निमंत्रण दिले आहे. त्या महामार्गाची लाज वाटते, तर सांगलीतील महामार्गांचा अभिमान वाटतो का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याबाबत सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावर केलेल्या वक्तव्याचे ‘लोकमत’मधील वृत्त झळकविले आहे. यावर विविध संघटना, नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गडकरींनी एकदा सांगली-तुंग आणि सांगली ते अंकली या रस्त्यांचा दौरा करावा, म्हणजे त्यांना या महामार्गांबद्दलची व्यथाही कळेल. त्यांच्या या रस्त्यांबाबतच्या भावना जाणून घेण्याची इच्छा सांगलीकरांना राहील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.साखळकर म्हणाले की, सांगलीतील महामार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यापेक्षा वाईट येथील संबंधित विभागाचा कारभार आहे. कामाची मुदत संपत आली तरी त्याची सुरुवात झालेली नाही. सांगली-पेठ या एकाच रस्त्यावरील दोन टप्प्यातील काम पूर्ण होताना तिसºया टप्प्याचे काम रेंगाळतेच कसे? संयम राखून जिवाशी चाललेला खेळ पाहत बसायची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. आम्ही याप्रश्नी अजिबात संयम बाळगणार नाही.गडकरींना जर मुंबई-गोवा महामार्गाची लाज वाटत असेल, तर सांगलीच्या महामार्गांचा अभिमान वाटतो का? तसे असेल तर त्यांनी त्याबाबत जाहीर घोषणा करावी. एकवेळ त्यांनी या महामार्गांची अवस्था पाहावी आणि त्यांचे मतही मांडावे. आम्ही सर्वच पक्षांच्या लोकांना याबाबत जबाबदार धरत आहोत.प्रत्येकाच्याच सत्ताकाळात या रस्त्यांची दुखणी कायम राहिली आहेत. त्यामुळे ज्यांना अशा रस्त्यांची लाज वाटते, मनस्ताप होतो, त्यांनी किमान अभिमानास्पद वाटण्याजोगे चांगले रस्ते करावेत, असे आवाहन त्यांनी केले.‘त्या’ विमानाचे : सोशल उड्डाणसांगली-तुंग या रस्त्याच्या दुर्दशेवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर जागृती मंचने यावर विडंबनात्मक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. सांगली ते तुंग या मार्गाचे विमान व त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची सवारी, अशा आशयाचे हे व्यंगचित्र होते. त्याला पसंती दर्शवितानाच अनेकांनी याबाबत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाºयांची खिल्ली उडविली आहे. सध्या सोशल मीडियावर हे विमान उड्डाण घेत फिरत आहे.