शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
3
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
4
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
5
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
6
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
7
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
8
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
9
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
10
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
11
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
12
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
13
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
14
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
15
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
16
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
17
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
18
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
19
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
20
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'

जातनिहाय जनगणनेस नाही, आमचा विरोध जातीय राजकारणाला - केशव प्रसाद मौर्य 

By अविनाश कोळी | Published: June 12, 2023 6:49 PM

विरोधकांना अद्याप पंतप्रधान मोदींविरोधात एकही उमेदवार निवडता आलेला नाही

सांगली : काँग्रेस, समाजवादी पक्षासह विरोधकांनी आजवर जातीय राजकारण केले. भाजपने या गोष्टीला फाटा दिला. जातनिहाय जनगणनेस भाजपने विरोध केला नाही. आमचा विरोध जातीय राजकारणाला आहे. त्यामुळे सरकार याविषयी योग्य निर्णय घेईल, असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, जातनिहाय जनगणनेवरून विरोधक टीका करीत असतात. त्यावरून राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार व भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. कितीही प्रयत्न केले तरी भाजप व मोदींना ते पराभूत करू शकत नाहीत.देशात लोकसभा जागांचा विक्रम यंदा होईल. काही राज्यांमध्ये मित्रपक्षांशी मतभेद झाले असले तरी त्यामुळे पक्षावर लोकांचा विश्वास कमी झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत आजही अनेक मित्रपक्ष सोबत आहेत.

विरोधकांना अद्याप पंतप्रधान मोदींविरोधात एकही उमेदवार निवडता आलेला नाही. यावरून विरोधकांची अवस्था स्पष्ट होते. देशभरात आता विरोधकांची ताकद संपुष्टात आली आहे. यावेळी खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते...तर भाजपकडे एकहाती सत्ता असती

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजपने युती केली नसती तर स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्तेत आली असती. बिहारमध्ये भाजपपेक्षा छोट्या पक्षाला मुख्यमंत्रिपद व महाराष्ट्रात भाजपचा या पदावर असलेला आग्रह या सर्व गोष्टी पक्षश्रेष्ठींनी तत्कालीन परिस्थिती पाहून ठरविल्या आहेत. यात विरोधाभास काहीच नाही, असे मौर्य म्हणाले.आम्ही खेळाडूंचा सन्मान करतो

बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य उजेडात येईल, मात्र खेळाडूंचा आम्ही सन्मान करतो. त्यांना कधीही झिडकारले नाही, असे मत मौर्य यांनी व्यक्त केले.चौकट

आरोपींची अशी हत्या अयोग्यचउत्तर प्रदेशात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या काही आरोपींची हत्या झाली. अशाप्रकारच्या घटना लोकशाहीमध्ये अयोग्य आहेत. भाजप त्याचे समर्थन करीत नाही. एन्काउंटरबाबत मात्र आम्ही पोलिसांचे समर्थन करतो. सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये अशा चकमकी होत असतात, असे मौर्य यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा